चर्चा:किशोरवय
किशोरवय (Adolescence) हा माणसाच्या वाढ व विकासाच्या प्रक्रियेतील एक कालखंड असून पौगंडावस्था (Puberty) हा त्यातील फक्त एक ’लैंगिक वाढ व विकासाचा टप्पा आहे. म्हणून ती दोन वेगळी पाने असावी असे वाटल्याने मी दोन्ही पाने वेगळी करून संपादित करण्याचे काम सुरू केले आहे. इंग्रजी विकिपीडियामधेही तशी दोन वेगवेगळ पाने आहेत. आत्ताचे ’पौगंडावस्था’ हे पान मी जेव्हा विस्तारित केले त्याच्या चर्चापानामधेही मी तसे म्हटले आहे. सध्या किशोरवय हे पान लिहून पूर्ण करून मग पौगंडावस्था या पानाचे संपादन करण्याचे ठरवले होते. परंतु सध्याचे पौगंडावस्था हे पान तसेच ठेवायचे असल्यास किशोरवय हे पान लिहिण्याचे काम मी थांबवीन. त्याबद्दल मला आपण दोघांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. तसेच पौगंडावस्था या मूळ पानात देलेल्या दुव्यांपैकी अनेक पाने रिक्त आहेत. ती पाने एक एक लिहून ’मनुष्याची वाढ व विकास’ हा भाग पूर्ण करावा असा विचार आहे. तरी त्याबद्दलही मार्गदर्शन करावे ही विनंती.
- @Rajendra prabhune:
- डॉ.साहेब आपण आपल्या विषयातले तज्ञ आहात आणि आपणास सुयोग्य वाटते तसे दोन वेगवेगळे अथवा एकत्र लेख बनवावेत अथवा गरजे प्रमाणे संपादन करावे. या विषयात सुचना करण्याची इतरांनी घाई करण्या पेक्षा आपणास पुरेसे लेखन आणि संपादन स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५३, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)
मराठी विकीपीडियावर पौगंडावस्था आणि किशोरवय हे दोन लेख आता जवळजवळ पूर्णावस्थेत आहेत. ते वाचून अभिप्राय द्यावा व सूचना द्याव्यात ही विनंती. तसेच इंग्रजीमधील ‘Adolescence’ या लेखाच्या मराठी लेखासाठी असलेल्या लिंकवरून “पौगंडावस्था” हा मराठी लेख येतो तिथे “किशोरवय” हा लेख आला पाहिजे व ‘Puberty’ या लेखाच्या मराठी लेखासाठी असलेल्या लिंकच्या पुढे कोणताच लेख नाही तिथे “पौगंडावस्था” हा लेख यायला हवा. तज्ज्ञ संपादकानी ही दुरुस्ती करावी किंवा दुरुस्ती कशी करावी याबद्दल मला मार्गदर्शन करावे ही विनंती.
राजन ११:४३, ८ जून २०१७ (IST)
योग्य लिंक्स देणे साध्य झाले.
राजन २०:२९, ८ जून २०१७ (IST)
- पौगंडावस्था या लेखाप्रमाणेच हा लेखही उत्तमप्रकारे लिहिला गेला आहे.
- हा लेख कालांतराने मुखपृष्ठ सदर लेख होण्याच्या प्रतीचा आहे.
- धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) २२:४८, ८ जून २०१७ (IST)
धन्यवाद.
--Rajendra prabhune १०:४९, ८ ऑक्टोबर २०१७ (IST)
मराठी विश्वकोशातील संदर्भ
"विकासात्मक अभ्यासाचे कालखंड : मानवी आयुष्यात होणारे बदल नेमकेपणाने अभ्यासता यावेत म्हणून मानवी आयुष्याची एकूण अकरा कालखंडात विभागणी केली जाते. जीवन जरी सलग असले, तरी अभ्यासाच्या सोयासाठी आणि काही खास वैशिष्ट्यांना धरून हे कालखंड मानले जातात :
(१) प्रसूतिपूर्व कालखंड : गर्भधारणेपासून जन्मापर्यंत. (२) अर्भकावस्था : जन्मापासून दोन आठवडे. (३) शैशवावस्था : वय दोन आठवडे ते २ वर्षे. (४) बाल्यावस्था : पूर्वकाल: वय २ ते ६ वर्षे. (५) बाल्यावस्था : उत्तरकाल: वय १० ते १० वर्षे. (६) किशोरावस्था : वय १० ते १३−१४ वर्षे. (७) कुमारावस्था : पूर्वकाल वय १३−१४ ते १८ वर्षे. (८) कुमारावस्था : उत्तरकाल : वय १८ ते २१ वर्षे. (९) तारुण्यावस्था : वय २१ ते ४० वर्षे. (१०) प्रौढावस्था : वय ४० ते ६० वर्षे. (११) वृद्धावस्था : ६० वर्षे वयानंतरचा काळ."
मराठी विश्वकोशातील वरील संदर्भांनुसार माणसाच्या वाढ-विकासातील अवस्थांची नावे मराठी विकीपेडियातील संबंधित लेखांनाही असावीत असे वाटते.
त्यानुसार "मानवी वाढ व विकास" या वर्गातील लेखांची नावे पुढीलप्रमाणे असावीत असे वाटते.
गर्भावस्था, अर्भकावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था.
त्यानुसार या लेखाचे नाव "किशोरवय" या ऐवजी "कुमारावस्था" असावे असे वाटते म्हणजे गोंधळ होणार नाही. तसेच "कुमार" किंवा "कुमारवय" या लेखाचे नाव "किशोरावस्था" असे असेल. (असा लेख अजून अस्तित्वात नाही. पुढे तोही लिहिण्याचा विचार आहे.) असे बदल आणि त्यानुसार जरुरीप्रमाणे इतर (विशेषतः "पौगंडावस्था") लेखातील दुव्यांची दुरुस्ती पुढील आठवड्यांत करण्याचा विचार आहे.
याबद्दल आपली मते कळवावी.
मराठी विश्वकोशातील पारिभाषिक शब्दांविषयी संशय नसावा आणि त्यामुळे मराठी विकीवर ते शब्द वापरण्यास हरकत नसावी असे वाटते.
--Rajendra prabhune ११:०६, ८ ऑक्टोबर २०१७ (IST) --राजेंद्र प्रभुणे (चर्चा)
संदर्भ व शिर्षक
[संपादन]या लेखाचे जे शिर्षक आहे, त्याच नावाचा लेखात एक विभाग सुद्धा आहे, किशोरवय या विभागाऐवजी दुसरे समर्पक नाव असावे असे वाटते.
संदर्भ:- या लेखात लावलेले सर्व संदर्भ इंग्रजी "विकिपीडिया"चे आहेत, विकिपीडियाला विकिपीडियाचे संदर्भ देता येत नसतात. कृपया, लेखकांनी यात बदल करावा. --संदेश हिवाळेचर्चा १५:५३, ८ ऑक्टोबर २०१७ (IST)
--संदेश हिवाळेचर्चा १५:५३, ८ ऑक्टोबर २०१७ (IST)
- विकिपीडियाला विकिपीडियाचे संदर्भ टाळणे श्रेयस्कर असले तरी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद केला जात असेल तर दुसऱ्या भाषी विकिपीडियाचे संदर्भ तारीख आणि वेळेसह नोंदवणे अभिप्रेत असते,
- धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३१, ८ ऑक्टोबर २०१७ (IST)
आपल्या दोघांच्याही सूचनांबद्दल धन्यवाद. पुढील सर्व लेखांत या सूचनांचा विचार नक्की करीन. या लेखातही शक्य ते बदल यथावकाश करीनच. अशाच सूचना वेळोवेळी कराव्यात ही विनंती.
--Rajendra prabhune १०:१७, ९ ऑक्टोबर २०१७ (IST) --राजेंद्र प्रभुणे (चर्चा)
Excellent article
[संपादन]Very nicely written article! -- आभिजीत ०१:०८, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)