चर्चा:उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुम्ही इंग्रजी मध्ये लिहिलेले नाव काढले आहे कारण समजेल का? की इंग्लिश विकिपीडियाचा दुवा काढत असाल तर पुढच्या बदलांमध्ये मी तो टाकणार नाही. @अभय नातू Omega45 (चर्चा) १२:१८, १९ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

@Omega45: प्रत्येक स्वतंत्र लेख आधीच इंग्लिश विकिपीडियाच्या लेखास विकिडेटाद्वारे जोडलेला आहे. त्यामुळे इंग्लिश विकिपीडियाचा जो दुवा आपण प्रत्येक पानावर जोडत आहात त्याची आवश्यकता नाही‌, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १२:२०, १९ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
@Omega45:
इंग्लिश विकिपीडियाचा दुवा लेखात घालण्याचे प्रयोजन नाही. असे आंतरविकी दुवे विकिडेटाद्वारे आपोआप इंग्लिश आणि इतर सगळ्या भाषांतील लेखाशी लावले जातात. डावीकडे खालच्या भागात आंतरविकी दुवे पाहिले असता ते दिसतील.
अभय नातू (चर्चा) १२:२२, १९ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
@अभय नातू: इंग्रजी मध्ये नाव टाकलेले चालेल ना पण?
@Omega45:
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ लेखांत इंग्लिश नाव घालू नये. सहसा इतर भाषेतील नाव घालण्यासाठीची कारणे अशी आहेत --
१. मूळ नाव मराठी उच्चारापेक्षा वेगळे आहे, उदा. पॅरिस/पारि
२. मूळ नावाचा उच्चार क्लिष्ट आहे आणि देवनागरीत तो अचूकपणे लिहिता येत नाही, उदा. बीजिंग
अभय नातू (चर्चा) ०२:२८, २० नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]