चर्चा:आंबेडकर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारण द्या[संपादन]

@अभय नातू:

या लेखामध्ये मी जोडलेला '"वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके'" तुम्ही का हटवलात? तुमचा मानस बहुतेक असा आहे की, हा वर्ग नुसता वास्तू किंवा बिल्डिंगीसाठी वापरतात, पण तसे नव्हे. जर तुम्हाला हा वर्ग कुठे कुठे वापरतात ते माहिती नसेल तर तो वर्ग उघडून वाचा (इंग्रजी वर्ग ही पहा), मी त्यात त्याविषयी थोडी माहिती दिलेली आहे.

आणि हो ह्या लेखाच्या Ambedkar Nagar (Delhi Assembly constituency) ह्या इंग्रजी पानातील वर्ग सुद्धा तपासा. --संदेश हिवाळेचर्चा २०:२९, १ सप्टेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २०:२९, १ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:
स्मारक हा शब्द कोठे वापरतात आणि स्मारक हा वर्ग कोठे वापरावा या दोन कल्पनांमध्ये तुम्ही गोंधळ करीत आहात. इंग्लिश वर्गाकडे नामनिर्देश केल्याबद्दल धन्यवाद परंतु इंग्लिश विकिपीडियावरील सगळेच संकेत येथे वापरू नयेत असा शिरस्ता पूर्वीपासूनच आहे. Mahitgar आणि इतर अनेक सदस्य व प्रचालकांनी याचे प्रतिपादन केलेले आहे.
व्यक्तीचे नाव किंवा नुसता उल्लेख आल्याआल्या लेखाला स्मारक असा वर्ग लावू नये.
तुम्ही वर्गीकरण करीत असताना अतिव्यापक निकष लावीत आहात हे मी तुमच्या निदर्शनास आणून दिलेले आहेच तरी त्यावर अधिक लिहीत नाही.
अभय नातू (चर्चा) २१:०८, १ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

मला माहिती आहे की, इंग्लिश विकिपीडियावरील सगळेच संकेत येथे वापरता येत नाही. पण त्यात हा आंबेडकर स्मारके वर्ग ही समाविष्ट असावा हे अपेक्षित नाही. डॉ. आंबेडकरांचे नाव असलेल्या नाव असलेल्या प्रत्येक मराठी लेख शिर्षकात इंग्रजी विकि प्रमाणेच आंबेडकर स्मारके हा वर्ग असावा असे माझे मत आहे. कारण मी स्मारके म्हणजे केवळ एखादी वास्तू समजत नाही. --संदेश हिवाळेचर्चा १३:३५, २ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

तुमचा युक्तिवाद तर्कहीन आहे. किमानपक्षी impractical आहे. तुम्ही म्हणता असे करावयाचे ठरविल्यास (वर म्हणल्याप्रमाणे) प्रत्येक लेखाचे डझनावारी स्मारकांमध्ये वर्गीकरण करावे लागेल. हे करणे चुकीचे आहे. हा निकष फक्त आंबेडकरांच्या बाबतीत लागू होत नाही तर येथील सगळ्या व्यक्ती व इतरही विषयांवरील लेखांना लागू होतो.
असे असता लेखाच्या शीर्षकात किंवा मजकूरात उल्लेख आल्या आल्या लेखाचे आपोआप ....स्मारक वर्गीकरण करावे हा नियम लावता येणार नाही.
अभय नातू (चर्चा) १४:२७, २ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
ता.क. - शिवाजी नाव असलेला प्रत्येक व्यक्ती शिवाजी स्मारक ठरत नाही.