Jump to content

गो.मा. पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गो.म.पवार या पानावरून पुनर्निर्देशित)
G. M. Pawar (es); গো. ম. পাওয়ার (bn); G. M. Pawar (ast); गो. मा. पवार (hi); ಜಿ.ಎಂ.ಪವಾರ್ (kn); G. M. Pawar (en); G. M. Pawar (ga); गो.मा. पवार (mr); G. M. Pawar (nl) scrittore indiano (it); ভারতীয় লেখক (bn); écrivain indien (fr); India kirjanik (et); idazle indiarra (eu); escritor indiu (ast); escriptor indi (ca); Indian writer (en); escritor indiano (pt); Indian writer (en-gb); نویسنده هندی (fa); 印度作家 (zh); scriitor indian (ro); escritor indio (gl); סופר הודי (he); Indiaas schrijver (nl); ഇന്ത്യന്‍ രചയിതാവ്‌ (ml); كاتب هندي (ar); escritor indio (es); shkrimtar indian (sq); Indian writer (en); Indian writer (en-ca); індійський письменник (uk); scríbhneoir Indiach (ga)
गो.मा. पवार 
Indian writer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९३२
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गो. मा. पवार (जन्म : पानगाव-सोलापूर जिल्हा, १३ मे १९३२; - सोलापूर, १६ एप्रिल २०१९) हे एक मराठी साहित्य समीक्षक व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरुची, विनोद: तत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य' या चरित्रग्रंथास २००७चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

शिक्षण

[संपादन]

गो.मा. पवार ह्यांचे शालेय शिक्षण नरखेड येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेमधून झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम.ए. व औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी केले. त्यानंतर ३३ वर्षे ते विविध महाविद्यालयांत प्राध्यापक होते. अमरावतीचे सरकारी महाविद्यालय, औरंगाबाद विद्यापीठ व कोल्हापूर विद्यापीठ येथे त्यांनी अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर यथे राहून त्यांनी विपुल साहित्य लिहिले.

मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर गोमांनी खूप काम केले. त्यांनी १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असलेल्या 'गोमां'च्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.

पुस्तके

[संपादन]
  • द लाइफ अँड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (इंग्रजी)
  • निवडक मराठी समीक्षा
  • निवडक विठ्ठल रामजी शिंदे
  • भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे
  • मराठी विनोद : विविध आविष्काररूपे
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाड्मय खंड १ व २
  • विनोद : तत्त्व आणि स्वरूप
  • साहित्यमूल्य आणि अभिरुची,
  • सुहृद आणि संस्मरणे

पुरस्कार

[संपादन]
  • साहित्य अकादमी पुस्कार - २००७
  • डाॅ. व.दि. कुलकर्णी स्मृति पुरस्कार
  • सोलापूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार (२०१६)
  • भैरू रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर
  • शिवगिरिजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डूवाडी
  • रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार , वाई
  • पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगर
  • महाराष्ट्र फाऊंडेशनचा मराठी साहित्य पुरस्कार, मुंबई
  • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार,
  • धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, औरंगाबाद
  • शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार सोलापूर
  • मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबाद