गोविंद गुरु बंजारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोविंद गुरू बंजारा (1858-1931),  हे भारतातील एक सामाजिक आणि धार्मिक सुधारक होते. गोविंदगीरी बंजारा, संत गोविंद गोर या नावाने सुद्धा त्यांना संबोधले जाते. त्यांनी गाजवीलेल्या शौर्य, पराक्रम व समाजसुधारणे विषयी बंजारा आदिवासी साहित्यात मोठ्या सन्मानपूर्वक उल्लेख आढळून येतो. गोविंद गुरू बंजारा यांनी सध्याच्या राजस्थान आणि गुजरातच्या आदिवासीबहुल सीमावर्ती भागात 'भगत चळवळ' चे नेतृत्व केले.  'क्रांतिनायक संत गोविंद गुरू बंजारा', यांनी इंग्रजांच्या विरोधात राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात इत्यादी प्रदेशातील पाच लाख भील- बंजारा आदिवासींचे नेतृत्व करून मातृभूमीसाठी चळवळ सुरू केली.[१]

गोविंद गुरू बंजारा यांचा जन्म 20 डिसेंबर 1858 रोजी डुंगरपूर जिल्ह्यातील बन्सिया (बेडिया) गावात  गौर बंजारा कुटुंबात जन्म झाला.  लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाबरोबरच अध्यात्मातही रस होता.  महर्षी दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेने त्यांनी आपले जीवन देश, धर्म आणि समाजसेवेसाठी समर्पित केले.  त्यांनी वागद प्रदेशाला आपल्या उपक्रमांचे केंद्र बनवले.[२]

गोविंद गुरूंनी 1890 च्या दशकात भगत चळवळ सुरू केली.  चळवळीत अग्निदेवाला प्रतीक मानले जात असे.  अनुयायांना पवित्र अग्नीसमोर उभे राहून पूजेसह हवन (म्हणजे धुनी) करावे लागले.  1883 मध्ये त्यांनी 'संप सभा' ​​स्थापन केली.  याद्वारे कठोर परिश्रम करणे आणि साधे जीवन जगणे;  यज्ञ व कीर्तन करणे;  प्रत्येक गावात मुलांना शिकवण्यासाठी शाळा काढणे, पंचायतीमध्ये त्यांचे वाद सोडवणे, अन्याय सहन न करणे, जबरदस्ती मजुरी न करणे आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणे आणि स्वदेशीचा वापर करणे या सूत्रांचा प्रचार केला.

 17 नोव्हेंबर 1913 रोजी (मार्गशीर्ष पौर्णिमा) मानगडच्या टेकडीवर वार्षिक जत्रा भरणार होती.  याआधी गोविंद गुरू बंजारा यांनी सरकारला पत्र लिहून दुष्काळग्रस्त आदिवासींना शेतीवरील कर कमी करावा, त्यांना धार्मिक परंपरा पाळण्याची परवानगी द्यावी आणि सक्तीच्या मजुरीच्या नावाखाली त्यांचा छळ करू नये, अशी विनंती केली होती;  मात्र प्रशासनाने टेकडीला वेढा घातला आणि मशीनगन आणि तोफगोळे बसवले.  यानंतर त्यांनी गोविंद गुरूंना ताबडतोब मानगड टेकडी सोडण्याचा आदेश दिला. तोपर्यंत लाखो भाविक तेथे आले होते. कर्नल शॉटन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गोळीबार सुरू केला, ज्यामुळे हजारो लोक मारले गेले.  त्यांची संख्या 1,500 पर्यंत असल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांनी गोविंद गुरू बंजाराला अटक करून फाशी आणि नंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 1923 मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी  जनसेवेची विविध कामे सुरू ठेवली.  30 ऑक्टोबर 1931 रोजी कंबोई (गुजरात) गावात त्यांचे निधन झाले.  दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला लाखो लोक तेथे बांधलेल्या त्यांच्या समाधीला भेट देतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात.

गोविंद गुरूंनीही आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्याची निर्मिती केली. लोकांचे प्रबोधन करायचे.   गोविंद गुरू बंजारा  इंग्रजांकडून देशाच्या जमिनीचा हिशोब मागत आहेत आणि संपूर्ण देश आमचा असल्याचे सांगत आहेत.  आमची माती इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी आम्ही लढू. या आशयाचे आपल्या बंजारा गोरबोलीत गीत गात. संत गोविंद गुरू बंजारा यांनी मातृभूमी साठी दिलेले क्रांतिकारी योगदान आणि आदिवासी बंजारा समाजात घडवून आणलेली क्रांती देशाच्या इतिहासात सदैव प्रेरणा देणारी ठरली. बंजारा साहित्य मध्ये देखील त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख आढळतो. शिवाय बंजारा आदिवासी समाजात गोविंद गुरू बंजारा यांना एक क्रांतिकारी संत म्हणून आपले श्रद्धास्थान मानले जाते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ पवार, डॉ.अशोकराव (2022). क्रांतीनायक संत गोविंद गुरु बंजारा. ISBN 978-93-5578-848-1.
  2. ^ "अमर बलिदान का साक्षी मानगढ़ / 17 नवम्बर, 1913 | VSKgujarat" (इंग्रजी भाषेत). 2022-11-16. 2023-04-16 रोजी पाहिले.