गोवारी आदिवासी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गोवारी आदिवासी हा समाज मुख्यत्वेकरून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भात आढळून येतो. या समाजातील लोकांचे मुख्य काम गायी राखणे असते. ते गायींना दररोज चरावयास घेउन जातात. गोवर्धन पूजनाचे दिवशी ते गाय-गोधनाचा सण साजरा करतात. त्यांना (गुरे राखतो तो)गुराखी देखील म्हणतात. विदर्भातील जवळपास ४५०० गावात हा सण साजरा होतो. गोवारी पुरुष या दिवशी गोहळा-गोहळी नृत्य करतात. तसेच ढालपूजन करतात. येथे ढाल म्हणजे एका बासावर नवीन फडकी गुंडाळणे. यात गोहळा म्हणजे पुरुष व गोहळी म्हणजे स्त्रीरूप घेतलेला इसम. डफ,बासरी ढोल वाजवत संपूर्ण गावातून चांगल्या तऱ्हेने सजविलेल्या गायींची/जनावरांची मिरवणूक काढण्यात येते. यात विविध गाणेही म्हणण्यात येतात. पुढे ही ढालीची मिरवणूक गावातील सुताराचे घरी जाते. तेथे ढालीला पाणी पाजण्यात येते. नंतर विसर्जन होते.[१]