Jump to content

गुलमोहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलमोहर

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: वनस्पती
वर्ग: युडीकॉटस
कुळ: फाबेसी
जातकुळी: डेलॉनिक्स
जीव: रेजिया
शास्त्रीय नाव
डेलॉनिक्स रेजिया

गुलमोहर (शास्त्रीय नाव:डिलॉनिक्स रेजिया) हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असे नाव आहे. हा मूळचा मादागास्करचा आहे.

गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो.

झाडाखाली भगव्या फुलांचा बहर ओसरल्यावर गुलमोहरावर चपट्या फूट दीड फूट लांब आणि दोन ते तीन इंच रुंदीच्या तलवारीसारखा बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागतात. कालांतराने या शेंगातील बिया जमिनीवर पडून त्यापासून नवीन गुलमोहराची झाडे अंकुरतात.

जगभरात हे झाड निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीत बहरताना दिसत. समुद्रकिनारी असोत वा समुद्रसपाटीपासुन ह्जारो फूट उंचीपर्यंतचा डोंगराळ भाग असो. गुलमोहराचे झाड सर्व प्रथम मुंबईत शिवडी येथे आढळल्याचा उल्लेख एस.एम.एडवर्ड्‌स या शास्त्रज्ञाने १८४० साली तयार केलेल्या गॅझेटर ऑफ बाॅबे सिटी अँड आयलंड या वनस्पती-सूचित नमूद केले आहे.

महाराष्ट्रातील सातारा येथे दरवर्षी १ मे रोजी गुलमोहर दिन साजरा केला जातो. त्या दिवशी लहान थोरांपासून सगळे जण निसर्ग विषयक कविता वाचन, PAINTINGS, फोटोग्राफ्स, यांचा आनंद लुटतात. गेली कित्येक वर्षे हा उपक्रम चालू आहे. लोकांचे निसर्ग आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यांकडे लक्ष वेधावे म्हणून आकर्षक अशा फुलांनी बहरलेला गुलमोहर प्रातिनिधिक वृक्ष समजून गुलमोहर दिन साजरा केला जातो.

गुलमोहर हा मध्यापासून (?) ते थेट जुलै-ऑगस्ट पर्यंत या वृक्षाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. हा झटपट वाढणारा वृक्ष आहे. अदमासे ५०-६० फूट उंची पर्यंत वाढणारा गुलमोहर तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून बहरात येऊ लागतो. सामान्यत: गुलमोहराचे सरासरी आयुर्मान ४०-५० वर्षांचे असते. जमिनीकडे झेपावणाऱ्या फांद्यांमुळे गुलमोहराचा छत्रीसारखा घुमट तयार होतो. गुलमोहर वृक्षाच्या फांद्या तांबूस-तपकिरी असतात, तर गुलमोहराच्या खोडावरील साल असते काळ्या तपकिरी रंगाची. गुलमोहराच्या फांद्याची वाढ झपाट्याने होत असल्याने या झाडाची वारंवार छाटणी करणे श्रेयस्कर ठरते. गुलमोहराचा वृक्ष अत्यंत कमकुवत असतो. जोरदार वाऱ्या-वादळात गुलमोहराची झाडे सहज पडू शकतात. गुलमोहराची नाजूक लेससारखी मनमोहक हिरव्या-पोपटी रंगातील पाने संयुक्त प्रकारची असतात.अनेक छोट्या-छोट्या पानांनी बनलेल्या गुलमोहराच्या संयुक्त पानाची लांबी दोन फुटापर्यंत असू शकते. फेब्रुवारी-मार्च दरम्यान गुलमोहोराची पाने गळायला सुरुवात होते.... गुलमोहोराचे झाड ओकेबोके दिसू लागते. गुलमोहराला पुन्हा पालवी फुटते एप्रिल-मेच्या सुमारास....नेच्यासारखी दिसणारी लुसलुशीत कोवळी पाने गुलमोहराच्या सौंदर्यात भर टाकतात. गुलमोहोराच्या वैशिष्ट्यपूर्ण पाच लाल-केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात अन् त्यामुळे या फुलाचे सौंदर्य अधिकच खुलते....गुलमोहराच्या फुलाचे वैशिष्ट्य आहे की त्यातील एक इतर पाकळ्यांहून निराळी असलेली पाकळी....जी रंगाने मुख्यत्वे पिवळी असते आणि त्यावर लाल नाजूक रेषा असतात. गुलमोहराला अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मायामी इथे विशेष स्थान लाभले....दरवर्षी गुलमोहर बहरात येण्याच्या काळात इथे वार्षिक 'गुलमोहर फेस्टिव्हल'चे आयोजन केले जाते....मिरवणुका काढल्या जातात....फुगे फुगवून, कॉन्फेटी उधळत नाच, गाणी म्हणत, सहली काढत मायामीत 'गुलमोहर फेस्टिव्हल' साजरा केला जातो. कॅरिबियन बेटावर गुलमोहराच्या शेंगा जळण म्हणून वापरतात. अशा सुंदर गुलमोहराचा छोटा अवगुण म्हणाल तर गुलमोहराची मुळे....गुलमोहराची मुळे गुलमोहराचे झाड जसे वाढत जाते तशी मोठी होत जातात....आधार मुळांसारखी....जमिनीच्या नजीक गुलमोहराचा बुंधा उंचावतो व पसरट आधार मूळं जमिनीतून डोके वर काढतात....कधीकधी ही गुलमोहराची मुळे इमारतींचा भक्कम पाया उखडून टाकू शकतात....गुलमोहराच्या जमिनीवर येणाऱ्या मुळांमुळे बगिच्यांत बांधलेले रस्ते किंवा दगडी पायवाटा गुलमोहर पार उखडून टाकू शकतो....पण इतक्या चांगल्या झाडाच्या या छोट्या दोषाकडे थोडा कानाडोळा करून जर गुलमोहर रस्ते इमारतींपासून थोडा दूर ठेवला तर या वृक्षासारखा सौंदर्यसंपन्न दुसरा वृक्ष नाही. अनेक वसाहतींच्या सभोवार, बागांमधून रंग उधळत गुलमोहराच्या पिळदार खोडांचे वृक्ष उभे आहेत.

गुलमोहर या शब्दाचे विश्लेषण

गुल्म<गुल्मः(संस्कृत)=गोळा; गुल्म=गाठ, गोळा

हृ((संस्कृत, क्रियापदम्)=हरण करणे, निवारण करणे, दूर करणे[]

गुल्मः हरति(संस्कृत)>गुल्महर=गाठ दूर करणारा/करणारी/करणारे

गुलमोहर=गाठ निवारण करणारा/करणार /करणारे;

'पिवळा गुलमोहर याला सूज, गाठ निवारण करण्याचा औषधी गुणधर्म आहे असे भारतीय औषशास्त्राचे मानणे आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  • []
  • []
  1. ^ Du Puy; D.; et al. (1998). "Delonix regia". IUCN Red List of Threatened Species. 1998. 11 May 2006 रोजी पाहिले.
  2. ^ [विक्षनरी "गुल्म"] Check |url= value (सहाय्य).
  3. ^ Nidhi, Suhane. [https//www: journal of Pharmacognosy and phytochemistry "Gulmohar an ornamental plant with medicinal uses Nidhi Suhane Rishi Raj Shrivastava Mahendra Singh Journal of Pharmacognosy and phytochemistry October 2016; 5(6): 245-248"] Check |url= value (सहाय्य). 11 September 2024 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 100 (सहाय्य)
  4. ^ Suhane, Nidhi (2016). [Journal of Pharmacognosy and Phytochemistry 2016; 5(6): 245-248 "Gulmohar an ornamental plant with medicinal uses"] Check |url= value (सहाय्य).
  5. ^ Suhane, Nidhi. "Gulmohar an ornamental plant with medicinal uses". ResearchGate. 11 September 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत