Jump to content

आय.यू.सी.एन. लाल यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(IUCN Red List या पानावरून पुनर्निर्देशित)
२००७ सालच्या आय.यू.सी.एन. लाल यादीमध्ये विविध जैविक गटातील जातींची टक्केवारी पुढीलप्रमाणे होती:   अतिशय चिंताजनक,   चिंताजनक,   असुरक्षित.

असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. लाल यादी ज्याला आय.यू.सी.एन. लाल यादी किंवा लाल डेटा यादी (इंग्रजी: IUCN Red List) म्हणतात, १९६४ मध्ये स्थापन केलेली सर्व जैविक प्रजातींच्या जागतिक संवर्धन स्थितीची सर्वात व्यापक यादी आहे. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (IUCN) हा जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रजातींच्या संरक्षण स्थितीवर लक्ष ठेवणारा सर्वोच्च संघ आहे. विविध देश आणि संस्था राजकीय व्यवस्थापन एककामध्ये एखादी प्रजात नामशेष होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करून प्रादेशिक लाल याद्यांच्या शृंखला तयार करतात.[१]

श्रेण्या

[संपादन]

आय.यू.सी.एन.च्या लाल यादीमध्ये प्रत्येक प्रजातीला नऊ पैकी एका श्रेणीमध्ये टाकले जाते. हे वर्गीकरण त्या प्रजातीची एकूण लोकसंख्या, लोकसंख्येतील घसरणीचा दर, भौगोलिक वितरण क्षेत्र, आणि त्यांची लोकसंख्या आणि वितरण क्षेत्र विखंडीत होण्याच्या दर या गोष्टींच्या आधारे केले जाते.

  • नामशेष (Extinct किंवा EX) – प्रजातीचा एकही जिवंत सदस्य नाही
  • जंगलातून नामशेष (Extinct in the Wild किंवा EW) – प्रजात जंगलांमधून पूर्णपणे नामशेष झाली आहे आणि याचे राहिलेले सदस्य फक्त प्राणीसंग्रहालयात किंवा त्यांच्या मूळ निवासस्थानापासून वेगळे एखाद्या कृत्रिम ठिकाणी जिवंत आहेत
  • अतिशय चिंताजनक (Critically Endangered किंवा CR) – प्रजात जंगलांमधून नामशेष होण्याचा अतिशय मोठा धोका आहे
  • चिंताजनक (Endangered किंवा EN) – प्रजात जंगलांमधून नामशेष होण्याचा धोका आहे
  • असुरक्षित (Vulnerable किंवा VU) – प्रजात जंगलांमध्ये चिंताजनक व्हायची शक्यता आहे
  • निकट-असुरक्षित (Near Threatened किंवा NT) – प्रजात जवळच्या भविष्यात चिंताजनक व्हायची शक्यता आहे
  • मुबलक (Least Concern किंवा LC) – प्रजातीला खूप कमी धोका आहे - मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत क्षेत्रात आढळणारी प्रजात
  • माहितीचा अभाव (Data Deficient किंवा DD) – प्रजातीबद्दल कमी माहिती उपलब्ध असल्याने तिची संरक्षण स्थिती आणि तिला असणाऱ्या धोक्यांचा अंदाज लावता येत नाही
  • अमूल्यांकीत (Not Evaluated किंवा NE) – प्रजातीच्या संरक्षण स्थितीचे आय.यू.सी.एन.च्या मानदंडांवर मूल्यांकन केले गेलेले नाही

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "आय.यू.सी.एन. लाल यादीचा आढावा" (इंग्रजी भाषेत).