Jump to content

गुंजन मावळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मावळ म्हणजे सह्याद्री पर्वतातल्या डोंगरावरून उतरणाऱ्या नदीचे खोरे. गुंजन मावळ म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक मावळ. हा गुंजवणी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ. याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे आहे. ह्या मावळाची देशमुखी सरदार शिळीमकर देशमुख या घराकडे होती

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य स्थापन करण्यात गुंजन मावळचे हैबतराव शिळीमकर देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांना स्वराज्य संघटक असेही म्हटले जाते.

गुंजन मावळत 84 गावे आहेत.गुंजन मावळचे आराध्यदैवत म् अमृतेश्वर आहे.गुंजन मावळच्या परिसरात राजधानी राजगड किल्ला आहे .

स्वराज्य स्थापन करण्यात गुंजन मावळाचा मोठा वाटा आहे.