हिरडस मावळ
Appearance
हिरडस मावळ हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येते. या मावळातील थोडा भाग हा निरा नदीच्या खोऱ्यात येतो. हिरडस मावळाला हे नाव हिरडोशी गावाच्या नावावरून दिल्या गेले होते. या मावळची देशमुखी ही बांदल घराण्याकडे होती. हिरडस मावळात एकूण त्रेपन्न गावे होती आणि त्यापैकी शिंद हे या मावळाचे मुख्य ठिकाण होते. शिंद या एकमेव गावच्या नावामागे कसबा ही उपाधी जोडलेली होती तर इतर गावांना मौजा ही उपाधी जोडलेली होती.