गायकवाड्स बरोडा स्टेट रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गायकवाड्स बरोडा स्टेट रेलवे- गाडी ओढण्यासाठी बैलांचा उपयोग

गायकवाड्स बरोडा स्टेट रेल्वे (जी.बी.एस.आर.) ही वडोदराच्या संस्थानिक गायकवाडांच्या मालकीची रेल्वे कंपनी होती.

या कंपनीने बडोदा संस्थानात मीटर गेज व नॅरो गेज लोहमार्गाचे जाळे उभारले व त्यावर रेल्वे सेवा पुरवली.

खंडेराव गायकवाडच्या सद्दीदरम्यान या कंपनीने इ.स. १८६२मध्ये डभोई पासून मियागाम करजण पर्यंतचा १३ किमी लांबीचा लोहमार्ग घातला. हा मार्ग ब्रिटिश भारतातील सर्वप्रथम नॅरोगेज तसेच ब्रिटिश मालकीचा नसलेला लोहमार्ग होता. सुरुवातीस या मार्गावर गाडी ओढण्यासाठी बैलांचा उपयोग व्हायचा. पुढील दहा वर्षांत या मार्गावरील रुळ बदलल्यावर इ.स. १८७३मध्ये नील्सन अँड कंपनीने तयार केलेले पहिले इंजिन या मार्गावर धावले. १८८०नंतर बैलांचा उपयोग थांबून हा मार्ग पूर्णपणे इंजिनांच्या ताब्यात आला.

सयाजीराव तिसऱ्यांच्या सद्दीत जीबीएसआरने आपले लोहमार्गाचे जाळे डभोईला केंद्र करून विस्तारले. अजूनही अस्तित्वात असलेले हे लोहमार्गजाळे जगातील सगळ्यात मोठे नॅरोगेज जाळे आहे.

इ.स. १९४९मध्ये ही कंपनी बी.बी. अँड सी.आय.मध्ये विलीन करण्यात आली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]