गादो-गादो
Appearance
गादो-गादो (मराठी लेखनभेद: गादो गादो , गादोगादो ; भासा इंदोनेसिया: Gado-gado ;), किंवा लोतेक (सुंदी, जावी: Lotek ;), हे इंडोनेशियात प्रचलित असलेले, शेंगदाण्याचा सॉस घालून बनवले जाणारे भाज्यांचे सलाड आहे. यात सहसा कच्च्या काकड्या, लेट्यूस, उकडलेले बटाटे, उकडलेले फणसाचे गरे, उकडून सोललेल्या अंड्यांचे काप, अर्ध-उकडलेल्या फरसबीच्या शेंगा, मोड आलेली कडधान्ये, हे घटकपदार्थ एकत्र मिसळून त्यांत दाण्यांचा दाट सॉस भरपूर प्रमाणात मिसळून सलाड एकत्र कालवले जाते. दाण्याच्या सॉसाच्या खाऱ्या, आंबट-गोड अश्या संमिश्र चवींमुळे गादो-गादोची चव चटकदार खारी-आंबट-गोड बनते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- गादो-गादोची पाककृती व चित्रे (इंग्लिश मजकूर)