गाजर हलवा
गाजर हलवा हा एक भारतीय खाद्य प्रकार आहे. यासाठी गाजर आणि दूध वापरले जाते. हा पदार्थ गोड असतो. गाजरापासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी गाजराचा हलवा हा पदार्थ अनेकांच्या घरी आवडीने बनवला जातो आणि चवीने खाल्ला ही जातो.
मूळ
गाजराचा हलवा हा पहिल्यांदा मुघल काळात सुरु झाला होता आणि याचे नाव अरबी शब्द "हलवा" पासून उद्भवले आहे, ज्याचा अर्थ "गोड" असा आहे आणि तो गाजर पासून बनविला गेला आहे त्यामुळे तो गाजर का हलवा म्हणून ओळखले जात असे. गाजर का हलवा म्हणजे गाजरची खीर किंवा गाजराचा हलवा. याचा पंजाबशी जोरदार संबंध आहे पण तिथून तिचा उगम झाला की नाही हे स्पष्ट नाही. हे पंजाबी हलव्याच्या इतर प्रकारांसारखेच आहे. गाजराच्या हलव्यामध्ये मूळत: गाजर, दूध आणि तूप होते पण आजकाल मावा (खवा) सारख्या बर्याच घटकांचा समावेश आहे.
पारंपारिकपणे गाजराचा हलवा हे मिष्टान्न म्हणून दिवाळी, होळी, ईद अल-फितर आणि रक्षाबंधन या निमित्ताने भारतात सर्व सण-उत्सवाच्या वेळी बनवला आणि खाल्ला जातो. साधारणपणे हिवाळ्यामध्ये हे मिष्टान्न गरम गरमच खाल्ले जाते. गाजराचा हलवा हा इतर गोड पदार्थांसारखा जास्त काळ चांगला राहू शकत नाही त्यामुळे हा कमी प्रमाणात तयार केला जातो आणि कमी प्रमाणातच निर्यात केला जातो.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
साहित्य: • किसलेले गाजर: २ कप • दुध: ३ कप • वेलदोडा पुड: १/२ टी स्पून • साखर: १/२ कप (चविनुसार) • तुप: २ टेबल स्पून • बारीक कापलेले काजु आणि बदाम: २ टेबल स्पून • बेदाणे: १ टेबल स्पून
कॄती: 1. एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध गरम करायला ठेवा. अधुन-मधुन दुध हलवत रहा. आपल्याला हे दुध जितके जास्त आटवता येईल तितके आटवायचे आहे. 2. एका बाजूला गाजर किसून घ्या. 3. एका वाटीत दुध घेऊन त्यात काजु, बदाम, बेदाणे भिजायला ठेवा. 4. एका भांड्यामधे तुप गरम करा. ह्या तुपात किसलेले गाजर ४-५ मिनिटे भाजा. 5. गाजर थोडे शिजल्यावर त्यात आटवलेले दुध घाला. जो पर्यन्त सगळे दुध आटत नाही तो पर्यन्त हे गाजर शिजवा. 6. नंतर त्यात साखर, काजु, बदाम, बेदाणे, वेलदोडा पुड घाला आणि सगळे नीट मिक्स करा व हा हलवा अजून ४-५ मिनिटे शिजवा. झाला गाजराचा हलवा तयार... हा हलवा तुम्ही गरम-गरम खाऊ शकता.