Jump to content

गणपतराव आंदळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणपतराव कृष्णाजी आंदळकर (१५ एप्रिल, १९३५, पुनवत, ता. शिराळा - १६ सप्टेंबर, २०१८, पुणे) हे कोल्हापूरमधील कुस्तीगीर होते. त्यांनी 'हिंद केसरी' हा किताब मिळवला होता.[]

सुरुवातीचे दिवस

[संपादन]

मूळ आंधळी गावचे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आंधळकर खास कुस्ती शिकण्यासाठी कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात १९५० साली आले. तेथे मोतीबाग तालमीत बाबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले.

कारकीर्द

[संपादन]

आंदळकर यांना बळकट देहयष्टी लाभली होती. ते ६ फूट उंचीचे होते. जन्मजात गुणांना तालमीची जोड देऊन त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या.लपेट, कलाजंग, एकेरीपट, एकलंघी या कुस्तीतील डावांमध्ये ते तरबेज मानले जात.[]

  • हिंद केसरी

१९६० मध्ये पंजाबच्या खडकसिंग या मल्लाला अस्मान दाखवून त्यांनी 'हिंद केसरी'ची गदा मिळवली.

१९६४ मध्ये तोक्यो, जपान येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आंदळकर सहभागी झाले होते. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली. त्यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले.[]

कुस्ती प्रशिक्षक

[संपादन]

महाराष्ट्रामध्ये मॅटवरील कुस्ती आणण्यात आंदळकरांचा मोठा वाटा आहे.“महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा जपायची असेल तर गाव तिथं तालीम व मॅट असायला हवी आणि कुस्तीगिरांनाही सरकारचा आश्रय मिळायला हवा.” असे ते सांगत. ज्या तालमीत ते कुस्ती शिकले, त्या मोतीबाग तालमीतच वयाच्या ८३ व्या वर्षापर्यंत ते कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यांत दादू चौगुले, चंबा मुतनाळ, विष्णू जोशीलकर, संभाजी पाटील बाला रफीक शेख इ.यांचा समावेश आहे.

पुरस्कार

[संपादन]
  • अर्जुन पुरस्कार (१९६४)[]
  • शिव छत्रपती पुरस्कार (१९८२)[]
  • राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट, कोल्हापूरचा शाहू पुरस्कार (२०१४)[]
  • सर्वश्रेष्ठ सौष्ठव पुरस्कार
  • महाराष्ट्रगौरव पुरस्कार
  • कोल्हापूरभूषण पुरस्कार

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यावर एक दृष्टीक्षेप". महाराष्ट्र टाइम्स. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "व्यक्तिवेध: गणपतराव आंदळकर". Loksatta. 2014-06-24. 2018-09-19 रोजी पाहिले.
  3. ^ "लाल मातीतील राजबिंडा कोहिनूर हिरा-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "गणपतराव आंदळकर-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं निधन". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-16. 2018-09-19 रोजी पाहिले.
  6. ^ "मातीनंच केलं माझ्या आयुष्याचं सोनं". Lokmat. 2014-06-27. 2018-09-19 रोजी पाहिले.