दादू चौगुले
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्मजात नाव | दादू चौगुले |
पूर्ण नाव | दादू चौगुले |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
निवासस्थान | कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
जन्मदिनांक | १ जानेवारी, १९४६ |
जन्मस्थान | कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
मृत्युदिनांक | २० ऑक्टोबर, २०१९ |
मृत्युस्थान | कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | कुस्ती |
खेळांतर्गत प्रकार | फ्रीस्टाईल कुस्ती |
संघ | भारत |
प्रशिक्षक | गणपतराव आंदळकर, बालू बिरे |
कामगिरी व किताब | |
राष्ट्रीय स्तर | महाराष्ट्र केसरी, रुत्सम-ए-हिंद, महान भारत केसरी |
दादू चौगुले (१९४६ – २० ऑक्टोबर २०१९) हे कोल्हापूर येथील एक नामवंत भारतीय कुस्तीगीर होते. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र केसरी हा प्रतिष्ठेचा किताब जिंकला होता, तसेच त्यांना रुस्तम-ए-हिंद आणि महा भारत केसरी हे किताबही देण्यात आले होते.[१]
ते भारताच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले होते आणि ९७४ मधील ब्रिटिश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये न्यू झीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत जडवजन गटात रौप्य पदक मिळवले होते. २०१८ मध्ये भारत सरकारने त्यांना ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरवले.[२]
२० ऑक्टोबर २०१९ रोजी कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ७३ होते.[३]
त्यांनी कोल्हापूरमधील मोतीबाग तालिम या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात गणपतराव आंदळकर आणि बाळू बिरें यांच्यासारख्या नामवंत कुस्तीपटूंच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक भारतीय कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते.[३]
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र केसरी (१९७०, १९७१)
- रुसतम-ए-हिंद (१९७३)
- महान भारत केसरी (१९७३)
- १९७४ ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक
- ध्यानचंद पुरस्कार (२०१८)
संदर्भ
[संपादन]- ^ "Badam-Doodh & Kolhapuri Kusti!". UpperCrust India.
- ^ "दादू चौगुले - ध्यानचंद, राही, स्मृती यांना अर्जुन पुरस्कार---दादू चौगुले, राही, स्मृतीच्या पुरस्काराने क्रीडानगरीत आनंदाची लाट". लोकमत. 21 सप्टेंबर 2018.
- ^ a b "Maharashtra wrestling legend Dadu Chougule dies of heart attack". टाईम्स ऑफ इंडिया. 21 ऑक्टोबर 2019.