खोत
खोत हा ब्रिटिश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील शेतसारा गोळा करून तो सरकारला देत असे.
खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येत होती. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.
खोतांचे अधिकार
[संपादन]एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
कोकणातील बहुतांशी खोत घराणी ही मराठा, ब्राम्हण, प्रभू, वाणी, मुस्लिम या जातीतील असत. तर मुख्यत्वे कूळ म्हणून जमीन कसणाऱ्या भूमिपुत्र कुणबी, आगरी, गवळी, भंडारी, कोळी, माळी, तेली या समाजात देखील काही घराण्यांत अपवादात्मक पूर्वापार वतनदारी-खोतकी चालत आली होती.
खोतांच्या अधिकारांबद्दल बोलायचे झाल्यास खोत म्हणजे अष्टाधिकारी. ब-याच जणांचे खोत हे आडनाव आहे, म्हणजे त्यांच्याकडे खोतांचे अधिकार आहेतच असं नाही. काहींचे आडनाव खोत नाहीय, पण त्यांना खोत म्हणतात- त्यांच्यापाशी खोतांचे सर्व काही अधिकार असतात. उदाहरणादाखल तळकोकणात सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील वराड-कुसरवे शिरखंड स्थित येथील चिंदरकर आडनाव असणारे घराणे आहे, त्यांना तेथे खोत म्हणतात. वरती लिहिल्याप्रमाणे हेच ते अष्टाधिकारी, त्यांच्याकडे खोतांचे सर्व अधिकार आहेत. खोताची वाडीत-गावात मोठी वट असते, वाडीतील अतीमहत्त्वाची दैविक कामे करण्याची ताकद त्यांच्यात असते व त्यांचा तो परंपरागत हक्क असतो. गावात मोठा मान व आदर खोताला मिळत असे.