Jump to content

खंडेराव कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खंडेराव कदम हे मराठा सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी योगदान दिले.

पूर्वज

[संपादन]

खंडेराव कदम यांचे पूर्वज बाजी कदमराव हे अहमदनगरच्या निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर यांच्या सेवेत देवळाली प्रवरा येथील एक सेनाधिकारी होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवल्याबद्दल त्यांना साक्री आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा कर्नाटकातील बंकापूर येथे मृत्यू झाला.

खंडेराव कदमांचे वंशज पानिपतच्या तिसऱ्या लढाईतही कदम घराण्यातील योद्धे लढले होते.