क्रिस्टोफर नोलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस्टोफर नोलन
जन्म क्रिस्टोफर जॉनाथन नोलन
३० जुलै, १९७० (1970-07-30) (वय: ५३)
लंडन, युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम
नागरिकत्व युनायटेड किंग्डम
अमेरिका
कार्यक्षेत्र सिने लेखक, निर्माता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ १९८५ ते चालू
पत्नी एमा थॉमस (१९९७-)
अपत्ये

क्रिस्टोफर नोलन (इंग्लिश: Christopher Nolan) (३० जुलै, इ.स. १९७० - हयात) हा एक इंग्लिश-अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे.

मेमेन्टो ह्या त्याने दिग्दर्शित केलेल्या व इ.स. २००२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे नोलन प्रसिद्धीझोतात आला. तेव्हापासून त्याने हॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांना घेऊन चित्रपट काढले आहेत. इ.स. २००३ साली बॅटमॅन ह्या काल्पनिक पात्रावरील सिनेमे पुन्हा काढण्याचे नोलनने ठरवले व त्या शृंखलेमधील बॅटमॅन बिगिन्स हा पहिला सिनेमा इ.स. २००५ तर द डार्क नाईट हा दुसरा सिनेमा इ.स. २००८ साली प्रदर्शित झाला. तिसरा व अखेरचा सिनेमा द डार्क नाईट राईजेस हा सिनेमा २० जुलै, इ.स. २०१२ रोजी जगभर प्रदर्शित झाला. नोलनच्या इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेल्या इन्सेप्शन ह्या सिनेमाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते.

नोलनने आजवर लिओनार्डो डिकॅप्रियो, अल पचिनो, क्रिश्चन बेल, मॉर्गन फ्रीमन, अ‍ॅन हॅथवे, मॅथ्यू मॅक्कॉनेही इत्यादी प्रसिद्ध अभिनेत्यांना आपल्या सिनेमांत कामे दिली आहेत.

सिने इतिहास[संपादन]

वर्ष चित्रपट श्रेय स्टुडियो जागतिक कमाई
दिग्दर्शक निर्माता लेखक इतर
१९९८ फॉलोइंग होय होय   सिनेमॅटोग्राफर
एडिटर
मोमेंटम पिक्चर्स ४८, ४८२ अमेरिकी डॉलर
२००० मेमेन्टो होय होय ३,९७,२३,०९६ अमेरिकी डॉलर
२००२ इनसॉम्निया होय वॉर्नर ब्रदर्स ११,३७,१४,८३० अमेरिकी डॉलर
२००५ बॅटमॅन बिगिन्स होय होय ३७,२७,१०,०१५ अमेरिकी डॉलर
२००६ द प्रेस्टिज होय होय होय टचस्टोन पिक्चर्स
वॉर्नर ब्रदर्स
१०,९६,७६,३११ अमेरिकी डॉलर
२००८ द डार्क नाईट होय होय होय वॉर्नर ब्रदर्स १,००,१९,२१,६०० अमेरिकी डॉलर
२०१० इन्सेप्शन होय होय होय ८२,५५,३२,७६४ अमेरिकी डॉलर
२०१२ द डार्क नाईट राईझेस होय होय होय
२०१३ मॅन ऑफ स्टील होय होय
२०१४ इंटरस्टेलर होय होय होय वॉर्नर ब्रदर्स
पॅरामाउंट पिक्चर्स
३२२ दशलक्ष डॉलर्स

बाह्य दुवे[संपादन]

  • "नोलनच्या चाहत्यांचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)