क्रिस्टीना ॲपलगेट
क्रिस्टीना ॲपलगेट (२५ नोव्हेंबर, १९७१:हॉलिवूड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकेची चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिला एक एमी पुरस्कार मिळाला आहे आणि गोल्डन ग्लोब आणि टोनी पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे.
ॲपलगेटने १९८७-९७ दरम्यान मॅरीड... विथ चिल्ड्रन या मालिकेत केली बंडीची भूमिका केली होती. हिने बॅड मॉम्स आणि ॲंकरमॅन चित्रपटशृंखलांसह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. ॲपलगेटने ॲल्विन अँड द चिपमंक्स चित्रपटशृंखलेत ब्रिटनीच्या पात्राला आवाज दिला.