क्रिकेटचा सुवर्णकाळ
पहिल्या महायुद्धाच्या आधीची पंचवीस वर्षे ही क्रिकेटचा सुवर्णकाळ किंवा गोल्डन एज ऑफ क्रिकेट समजली जातात. १८९० च्या काउंटी स्पर्धेच्या उद्घाटनापासून महायुद्धाच्या सुरुवातीच्या या काळात चुरशीच्या अनेक स्पर्धा झाल्या तसेच उत्तम खेळाडू तेव्हा खेळले. या काळातील क्रिकेट खेळाडू खिलाडूवृत्तीने खेळत असत.[१]
यानंतरच्या काही वर्षांत अनेक नामांकित क्रिकेट खेळाडू युद्धात मारले गेले किंवा मृत्यू पावल्याने तेव्हाच्या लोकांना मागील पंचवीस वर्षांबद्दल अधिक ओढ वाटून असे नामकरण झाले.[१] शेकडो काउंटी व क्लब खेळाडूंशिवाय इंग्लंडचे कॉलिन ब्लाइथ, मेजर बूथ, केनेथ हचिंग्स; ऑस्ट्रेलियाचा टिब्बी कॉटर आणि दक्षिण आफ्रिकेचे रेजिनाल्ड हॅंड्स, बिल लंडी, रेजी श्वार्त्झ आणि गॉर्डन व्हाइट हे आठ कसोटी खेळाडू रणांगणावर मृत्यू पावले. याच सुमारास डब्ल्यू.जी. ग्रेस आणि व्हिक्टर ट्रंपरही मृत्यू पावले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b डेव्हिड फ्रिथ, द गोल्डन एज ऑफ क्रिकेट १८९०-१९४, लटरवर्थ प्रेस, १९७८; इंग्लिश मजकूर