क्युबन क्रांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चे गेवाराफिदेल कास्त्रो (१९६१)

क्युबन क्रांती (स्पॅनिश: Revolución cubana) ही क्यूबा देशामध्ये फिडेल कॅस्ट्रोने हुकुमशहा फुल्गेन्स्यो बतिस्ताच्या विरुद्ध चालवलेली एक लष्करी चळवळ होती.

मार्च १९५२ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष फुल्गेन्स्यो बतिस्ता ह्याने एका लष्करी बंडामध्ये क्यूबाची सत्ता बळकावली व तेथे आपली हुकूमशाही प्रस्थापित केली. त्याच्या कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे बतीस्ता अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाला परंतु क्यूबाच्या जनतेमध्ये त्याच्याविरुद्ध असंतोष पसरू लागला. फिडेल व राउल कॅस्ट्रो या दोघा भावांनी चे गव्हेरा या क्रांतीकारकाच्या मदतीमुळे लहान फौज तयार करून बतिस्ताच्या सैन्याशी गनिमी काव्याने लढा देण्याचे प्रयत्‍न सुरू केले. सुरूवतीला त्यांना बरेचदा अपयश आल्यानंतर त्यांनी मेक्सिकोमध्ये पळ काढला व तेथून हा लढा चालू ठवला. १ जानेवरी १९५९ रोजी बतिस्ताने डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये पलायन केले. फिडेल कॅस्ट्रोच्या सेनेने संपूर्ण क्यूबावर ताबा मिळवून सशस्त्र लढा संपुष्टात आणला. तेव्हापासून ते थेट २००६ सालापर्यंत क्यूबाची सूत्रे फिडेल कॅस्ट्रोच्या हातात राहिली.

२६ जुलै १९५३ ते १ जानेवारी १९५९ दरम्यान चाललेल्या ह्या चळवळीची परिणती बतिस्ताची सत्ता उलथवण्यात झाली. फिडेल कॅस्ट्रोने स्थापन केलेली २६ जुलै चळवळ ह्या संस्थेचे कालांतराने क्यूबा कम्युनिस्ट पक्ष ह्या साम्यवादी संघटनेमध्ये रूपांतर झाले.