कौशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kaushi (Marathi- कौशी) (3525365425)
Firmiana colorata (4520020169)
Firmiana colorata- flowers

कौशी या वृक्षाला मराठीमध्ये खवस असेही म्हणतात. कौशी हा वृक्ष मार्च-एप्रिल महिन्यात केशरी फुलांनी सजलेला दिसतो. पानगळीच्या मोसमात बघवत नाही असं किरटं झाड एकदा पानांनी डबरलं किंवा फुलांनी बहरलं की किती देखण दिसतं... पानगळीच्या जंगलात या झाडाची बहार मनोरम दिसते. पळस-पांगारा-सावरीच्या बहरायला साजेशी बहार असते खवशीची. याची फळंही अजबचं! पातळ हिरव्या पानांसारख्या फॉलिकलच्या दोन कडांवर याच्या टपोऱ्या चवळीएवढ्या बिया चिकटून असतात. असलं फळ क्वचितच कुठल्या झाडाला येतं. लांब देठाच्या हस्ताकृती पानांनी एरवी शोभणारं राखी रंगाच्या खवल्या खवल्यांच्या खोडाच खवशीच झाड खूप छान दिसत.

संदर्भ[संपादन]

वृक्षराजी मुंबईची प्रकाशक:मुग्धा कर्णिक