कोळमांडले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कोलमांडले
ताराबंदर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मुरुड
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा कोळी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४०२२०२
• एमएच/०६

कोलमांडले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.कोलमांडले गावाला ताराबंदर या नावाने संबोधले जाते.गावाच्या दक्षिणेकडील भागास फणसाड वन्यजीव अभयारण्य असून पश्चिमेला अरबी समुद्र आहे.या गावचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व कोळी समाजाचे लोक फार वर्षानुवर्षे राहत आहेत.तसेच मासेमारी हा येथील प्रमुख आणि एकमेव व्ययसाय आहे.या गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे.या गावात प्रामुख्याने सर्व कोळी बांधव राहत असल्याने नारळी पौर्णिमा,होळी,शिमगा हे सण मोठ्या उत्साहाने तसेच धुमधडाक्यात साजरे केले जातात.गावात जिल्हा परिषदेचे एक प्राथमिक विद्यालय आहे तसेच एक अंगणवाडीही आहे.गावात भव्य असे हनुमान मंदिर तसेच वेशिजवळ शंकर मंदिर व गावदेवी मंदिरही आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन[संपादन]

गावात सर्व महादेव कोळी समाजाचे लोक राहत असून मासेमारी हा येथील प्रमुख व्यवसाय समजला जातो.अत्यंत साधे राहणीमान येथे पाहायला मिळते.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

१.ताराबंदर बीच - गावाच्या नजीकच तारबंदर समुद्रकिनारा आहे.येथील संध्याकाळच्या वेळी निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक तसेच स्थानिक लोक येतात. २.हनुमान मंदिर- गावात पुरातन असे हनुमान मंदिर आहे येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती कार्यक्रम साजरा केला जातो.

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

बोर्ली,बारशिव,मांडला,भोईघर

संदर्भ[संपादन]

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम