कोर्दोबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोर्दोबा
Córdoba
स्पेनमधील शहर

Puente romano y mezquita.jpg
कोर्दोबामधील रोमन पूल
Flag of Córdoba, Spain.svg
ध्वज
Escudo oficial de Córdoba (España).svg
चिन्ह
कोर्दोबा is located in स्पेन
कोर्दोबा
कोर्दोबा
कोर्दोबाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 37°53′″N 4°46′18″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक -4.77167 संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, -4.77167गुणक: 37°53′″N 4°46′18″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक -4.77167 संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, -4.77167

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य आंदालुसिया
प्रांत कोर्दोबा
स्थापना वर्ष इ.स.पू. १६९
क्षेत्रफळ १,२५५.२ चौ. किमी (४८४.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९० फूट (१२० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ३,२८,०४१
  - घनता २६१ /चौ. किमी (६८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.cordoba.es


कोर्दोबा (स्पॅनिश: Córdoba) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील एक ऐतिहासिक शहर आहे. कोर्दोबा शहर स्पेनच्या दक्षिण भागात ग्वादालक्विव्हिर नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.२८ लाख होती.

कोर्दोबा शहराला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. हे शहर रोमन प्रजासत्ताकरोमन साम्राज्यातील प्रांतांच्या राजधानीचे शहर होते. आठव्या शतकामध्ये आयबेरियन द्वीपकल्प मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर कोर्दोबा कोर्दोबाची अमिरात व कोर्दोबाची खिलाफत ह्या राज्यांची राजधानी होती. दहाव्या शतकामध्ये कोर्दोबा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते असा अंदाज व्यक्त केल गेला आहे[१]. ह्या काळात कोर्दोबा इस्लामिक संस्कृतीचे शैक्षणिक केंद्र होते. आजच्या घडीला कोर्दोबा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

प्रमुख आकर्षणे
रोमनकालीन पाणचक्की  
कोर्दोबाचे रोमन मंदिर  
रोमन पूल  

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Largest Cities Through History.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: