सोनके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा. महाराष्ट्र ४१५५२५

सोनके गाव हे सातारा जिल्ह्यातील वसना नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.

नाव[संपादन]

सोनके म्हणजे "सोन्याचे" गाव असे म्हटले जाते..

भूगोल[संपादन]

सोनके गाव हे वाठार रेल्वे स्टेशनच्या वायव्य दिशेस ८ किलोमीटर अंतरावर, वाठार-वेळे या रस्त्यावर आहे. गावाच्या पश्चिमेस वसना नदीचवणेश्वर चा डोंगर आहे. गावाची शेती चारी दिशांना आहे. सोनके गावाच्या बाजूला पिंपोडे बु., वाघोली, चौधरवाडी, करंजोखोप, जगतापनगर, नांदवळभावेनगर ही गावे आहेत.

गावकरी[संपादन]

सोनक्याचे मूळ रहिवासी आसबे व धुमाळ असून, सध्या गावात शिंदे, भोईटे, बर्गे, जाधव, पवार, निंबाळकर्, कदम, चव्हाण, यादव, सुतार, गुरव, साठे, गंगावणे, शेख, इनामदार, सय्यद, आतार्, शिकलगार्, कांबळे, मोरे, वाठारकर, वेदपाठक, अचपळ, इथापे, चिंचकर, किरवे, नाईक, घोरपडे, जगताप, कोरडे, काकडे, वर्पे, अशा आडनावाची कुटुंबेपण आहेत.

ग्राम दैवत[संपादन]

काळ भैरवनाथ हे सोनके गावाचे ग्रामदैवत आहे. गावाचे रहिवासी भैरवनाथाला "नाथसाहेब" या नावाने संबोधतात. नाथसाहेबांचे गावात फार सुंदर असे मंदिर असून मंदिराचा परिसर अतिशय पाहण्यासारखा आहे. गावकरी नाथसाहेबांची जत्रा दरवर्षी अश्विन महिन्याच्या चौथ्या रविवारी भरते..

ग्रामव्यवस्था[संपादन]

गावाला स्वतःची ग्रामपंचायत आहे. गावाची स्वच्‍छता, पाणी व्यवस्था व गावाच्या घरपट्टी कराचा कारभार ग्रामपंचायत पाहते.

शिक्षण व्यवस्था[संपादन]

गावामध्ये इयत्ता दहावीपर्यंत शि़क्षणाची सोय आहे. गावात ३ बालवाडी वर्ग आहेत. प्राथमिक (पहिली ते सातवी) शिक्षण "जीवन शिक्षण विद्यामंदिर" या शाळेतून दिले जाते तर माध्यमिक (आठवी ते दहावी) हे शिक्षण वाघोली गावातल्या भारत विद्यामंदिर या हायस्कूलमधून दिले जाते. हायस्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम सातार्‍याच्या आदर्श ग्रुप बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी स्वखर्चाने करून दिले आहे.

शेती व्यवस्था[संपादन]

शेती हा गावकर्‍यांचा मुख्य व्यवसाय आहे.

ठळक घटना[संपादन]

१९८३ - ८ वी ते १० वी वर्ग असलेल्या हायस्कूलची स्थापना. २०१० - हायस्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण.