कोनीय विभेदन
एखाद्या वस्तूमधील लहानात लहान संरचनांना वेगळे करू शकण्याच्या दुर्बीण, कॅमेरा, सूक्ष्मदर्शक आणि डोळे, यांसारख्या प्रतिमा बनवू शकणाऱ्या यंत्राच्या क्षमतेला कोनीय विभेदन (इंग्रजी: Angular resolution) किंवा अवकाशीय विभेदन (Spatial resolution) म्हणतात. विभेदनक्षमता म्हणजे प्रतिमा बनवू शकणाऱ्या यंत्राची एखाद्या वस्तूतील कमीतकमी कोनीय अंतरावरील बिंदूंना वेगळे करून स्वतंत्र करून पाहण्याची क्षमता; किंवा दूरवरच्या दोन निकटच्या वस्तूंना वेगळे करून दोन स्वतंत्र वस्तू म्हणून पाहता येण्याची क्षमता.
स्पष्टीकरण
[संपादन]प्रतिमा बनवणाऱ्या यंत्रणेची विभेदनक्षमता डिफ्रॅक्शनमुळे[मराठी शब्द सुचवा] मर्यादित असते ज्यामुळे प्रतिमा पुसट होतात. डिफ्रॅक्शन प्रकाशाच्या लहर गुणधर्मांमुळे होते आणि ते यंत्राच्या घटकातील छिद्राच्या मर्यादित आकारावर अवलंबून असते. एखाद्या दृश्य यंत्रणेचे कोनीय विभेदन रेयलीच्या निकषाने ठरवता येते.[१] गोलाकार छिद्र गृहित धरले असता:
जिथे
- θ म्हणजे कोनीय विभेदन (रेडियन),
- λ म्हणजे प्रकाशाची तरंगलांबी,
- आणि D म्हणजे भिंगाच्या ॲपर्चरचा[मराठी शब्द सुचवा] व्यास आहे.
माणसाच्या डोळ्यांची विभेदनक्षमता
[संपादन]माणसाच्या डोळ्यांची विभेदनक्षमता १ मिनिट किंवा ०.०१६ डिग्री किंवा ०.०००३ रेडियन इतकी आहे.[२] याचा अर्थ माणूस उघड्या डोळ्यांनी चंद्रावरील एकामेकांपासून ११५ किलोमीटर दूर असलेल्या वस्तूंना वेगळे करून पाहू शकतो. किंवा माणूस १ किलोमीटर अंतरावरील एकमेकांपासून ३० सेंटीमीटरपर्यंत दूर असलेल्या वस्तू वेगवेगळ्या पाहू शकतो. त्याहून जवळच्या वस्तूंना त्याला वेगवेगळे पाहता येत नाही.
संदर्भ
[संपादन]- ^ Lord Rayleigh, F.R.S. (1879). "Investigations in optics, with special reference to the spectroscope". Philosophical magazine. 5 (इंग्रजी भाषेत). 8 (49): 261–274. doi:10.1080/14786447908639684. 19 January 2016 रोजी पाहिले.
- ^ मायरॉन यानॉफ, जे ड्यूकर. Opthalmogy 3rd Edition (इंग्रजी भाषेत). p. ५४. ISBN 0444511415.