कैलाश सत्यार्थी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैलाश सत्यार्थी

कैलाश सत्यार्थी (११ जानेवारी, इ.स. १९५४: विदिशा, मध्य प्रदेश, भारत - ) हे एक भारतीय बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते आहेत. १९९० सालापासून बालमजूरी उच्चाटनाचे काम करणाऱ्या सत्यार्थींच्या बचपन बचाओ आंदोलन ह्या संस्थेने आजवर सुमारे ८०,००० मुलांची सक्तमजूरीमधून मुक्तता केली आहे.

१० ऑक्टोबर २०१४ रोजी सत्यार्थींना नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर केले. हे पारितोषिक त्यांना पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईसोबत विभागून दिले गेले. बालमजुरी हटवण्यासाठी प्रयत्न करताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले तसेच त्यांच्या दोन सहकार्यांना मारून टाकण्यात आले आहे.

खाजगी जीवन[संपादन]

सत्यार्थी नवी दिल्लीमध्ये आपली पत्नी, मुलगा व मुलीसोबत राहतात.[१] सत्यार्थी हे उत्तम स्वयंपाकी आहेत.[२]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Kailash Satyarthi - Biography". Archived from the original on 2014-10-20. २०१४-१०-१० रोजी पाहिले.
  2. ^ Azera Parveen Rahman. "Kailash Satyarthi loves to cook for rescued child labourers". IANS. २०१४-१०-१० रोजी पाहिले.