के.बी. कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
के.बी. कुलकर्णी
पूर्ण नावकृष्णाजी भीमराव कुलकर्णी
जन्म ??
हिंडलगा, बेळगाव, भारत
मृत्यू मार्च ९, २००७
बेळगाव, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, कलाअध्यापन
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई

के.बी. कुलकर्णी (?? - मार्च ९, २००७) हे व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले विसाव्या शतकातील मराठी चित्रकार होते.

जीवन[संपादन]

के.बी.कुलकर्णी यांचा जन्म हिंडलगा या बेळगाव नजीकच्या गावी झाला. ते 'केबी' या नावाने प्रसिद्ध होते. शालेय शिक्षणानंतर चित्रकला प्रशिक्षणाकरता ते मुंबईच्या ’जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल झाले. १९३७ साली जे.जे.मधून त्यांनी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. मुंबईतील वास्तव्यात त्यांना चित्रकार जी.एस्‌. हळदणकरांचा सहवास व मार्गदर्शन लाभले.

पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर केबी मुंबईहून बेळगावला परतले. तेथील सेंट पॉल्स हायस्कुलात ते कलाशिक्षक म्हणून रुजू झाले. त्याच काळात त्यांनी बेळगावातील संयुक्त महाराष्ट्र चौकात ’चित्रमंदिर’ नावाची चित्रकला प्रशिक्षणसंस्था सुरू केली. या संस्थेतून रवी परांजपे, जॉन फर्नांडिस, मारुती पाटील, विकास पाटणेकर, किरण हणमशेट आदी चित्रकार घडले. याखेरीज बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण संस्थेच्या शिनोळी येथील जे.एन्‌. भंडारी आर्ट स्कूलमध्ये त्यांनी अनेक वर्षे मानद प्राचार्यपद सांभाळले.

केबी चित्रकलेच्या सर्व प्रकारांमध्ये सिद्धहस्त होते. तैलरंग, जलरंग, ऍक्रेलिक या सर्व माध्यमांमध्ये त्यांचा हातखंडा होता. पेन्सिल रेखाटन या त्यांच्या आवडत्या प्रकारात तर त्यांची विशेष ख्याती होती.

मार्च ९, २००७ रोजी कुलकर्ण्यांचे बेळगावातील राहत्या घरी कर्करोगाने निधन झाले.