रवी परांजपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रवी परांजपे
जन्म इ.स. १९३५
बेळगांव

रवी परांजपे (इ.स. १९३५:बेळगाव, कर्नाटक, भारत - ) हे चित्रकार, बोधचित्रकार आहेत. ते भारतीय चित्रकला शैलीत चित्र काढतात. त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. नंतर त्यांनी नैरोबी, केन्यामध्ये काम केले.

परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे.

पुस्तके[संपादन]

  • नीलधवल ध्वजाखाली (लेखसंग्रह)
  • ब्रश मायलेज (आत्मकथन)
  • शिखरे रंग रेषांची (परदेशी चित्रकारांचा परिचय ग्रंथ)

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार
  • ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१२)
  • दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार
  • ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार
  • शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६)

बाह्य दुवे[संपादन]