केशवराव कोरटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केशवराव कोरटकर
जन्म इ.स. १८६७
वसमत, परभणी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २१ मे, इ.स. १९३२
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू

केशवराव कोरटकर (इ.स. १८६७:वसमत, परभणी जिल्हा, महाराष्ट्र - २१ मे, इ.स. १९३२) हैदराबाद संस्थानचे मुख्य नायाधीश होते.

वैयक्तिक[संपादन]

त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाले. तेथे त्यांनी नंतर वकिली केली. निवृत्तीनंतर त्यांनी डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणे सामाजिक व राजकीय कार्य केले.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम[संपादन]

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी आपल्या कुटुंबासह भाग घेतला.

नाट्यप्रेम[संपादन]

कोरटकरांनी बंगाली रंगभूमी अभ्यास केला होता. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी त्यांनी या दोन्ही रंगभूमींचे तुलनात्मक अध्ययन केले होते.

न्यायमूर्ती केशवराव कोरटकर हे इ.स. १९२२ साली पुणे येथे झालेल्या १८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.