केलुचरण मोहपात्रा
भारतीय ओडिसी नर्तक व पद्मभूषण पुरस्कृत ओरिसातील पाहिली व्यक्ती | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | କେଳୁଚରଣ ମହାପାତ୍ର | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जानेवारी ८, इ.स. १९२६, ऑगस्ट १, इ.स. १९२६ Raghurajpur | ||
मृत्यू तारीख | एप्रिल ७, इ.स. २००४ भुवनेश्वर | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
केलुचरण मोहपात्रा (जन्म : ८ जानेवारी १९२६; - ७ एप्रिल २००४ ) हे अभिजात भारतीय ओडिसी नर्तक आणि गुरू होते. [१] त्यांनी विसाव्या शतकात ओडिसी नृत्य कलेचे पुनरुज्जीवन केले.[२] पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे ते ओरिसातील पहिली व्यक्ती आहेत.[३]
प्रारंभीचे आयुष्य
[संपादन]भगवान जगन्नाथाला प्रसन्न करण्यासाठी सादर केला जाणारा गोतीपुआ हा ओरिसातील पारंपरिक नृत्यप्रकार गुरू केलुचरण मोहपात्रा यांनी तरुणपणीच सादर केला. यात स्त्रियांची वेशभूषा करून पुरुष नृत्य करीत असत.
कलेचे पुनरुज्जीवन
[संपादन]नंतरच्या आयुष्यात त्यांनी गोतीपुआ व माहारी या नृत्य प्रकारांत संशोधन केले, व त्यांतून त्यांनी एकूणच ओडिसी नृत्याची पुनर्बांधणी केली.[४]गुरू केलुचरण मोहपात्रा हे तालवाद्यवादनात कुशल होते. मृदंग, पखवाज व तबला ह्यांतील त्यांचे कौशल्य त्यांनी केलेल्या नृत्यरचनांतून दिसून येते. पारंपरिक पट्टचित्रकला प्रकारातही ते प्रवीण होते.
नृत्यसंस्था
[संपादन]गुरू केलुचरण मोहपात्रा, त्यांच्या पत्नी लक्ष्मीप्रिया व मुलगा रतिकांत ह्यांनी सन १९९३मध्ये सृजन ही नृत्यसंस्था स्थापन केली.
सन्मान व पुरस्कार
[संपादन]- संगीत नाटक अकादमी पुरस्कार - इ.स.१९६६
- पद्मश्री- इ.स.१९७४
- पद्म भूषण -इ.स. १९८८
- संगीत नाटक अकादमी फेलोशिप- इ.स.१९९१
- पद्म विभूषण- इ.स. २०००
- मध्य प्रदेश शासनाकडून कालिदास सन्मान
संदर्भ
[संपादन]- ^ Citaristi, Ileana (2001-01-01). The Making of a Guru: Kelucharan Mohapatra, His Life and Times (इंग्रजी भाषेत). Manohar. ISBN 9788173043697.
- ^ Verma, Archana (2011-01-18). Performance and Culture: Narrative, Image and Enactment in India (इंग्रजी भाषेत). Cambridge Scholars Publishing. ISBN 9781443828321.
- ^ KISSELGOFFOCT., ANNA (OCT. 19, 2000). "DANCE REVIEW; Sculptural And Sensual, It's Odissi".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Sangeet Natak (इंग्रजी भाषेत). Sangeet Natak Akademi. 2002.