Jump to content

कुचिनोशिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुचिनोशिमा
Native name:
जपानी: 口之島
सप्टेंबर २००१ मधील कुचिनोशिमा
Geography
स्थान पूर्व चीन समुद्र
Coordinates 29°58′0″N 129°55′0″E / 29.96667°N 129.91667°E / 29.96667; 129.91667
Archipelago तोकारा द्विपसमुह
क्षेत्रफळ साचा:Convinfobox/pri2
Coastline २०.३८ km (१२.६६४ mi)
Highest elevation ६२८.५ m (२,०६२ ft)
Highest point Maedake
Administration
जपान
कागोशिमा प्रांत
Demographics
Population १४० (२००४)
Ethnic groups जपानी

कुचिनोशिमा (口之島?) याचा शब्दशः अर्थ "तोंड बेट" असा होतो. हे कागोशिमा प्रांतातील तोकारा बेटांपैकी एक बेट आहे. या बेटाचे क्षेत्रफळ १३.३३ चौरस किमी (५.१५ चौ. मैल) आहे. याची लोकसंख्या १४० आहे.[१] बेटावर फक्त बोटीनेच पोहोचता येते कारण त्याला विमानतळ नाही. मुख्य भूमीवरील कागोशिमा शहरापासून येथे जाण्यासाठी नियमित फेरी सेवा आहे. प्रवास वेळ सुमारे ६ तास आहे. येथील रहिवासी प्रामुख्याने शेती, मासेमारी आणि हंगामी पर्यटनावर अवलंबून आहेत. हे बेट जपानी मूळ गुरांच्या दुर्मिळ कुचिनोशिमा जातीचे घर आहे.

भूगोल[संपादन]

कुचिनोशिमा सह तोकारा बेटांचा नकाशा

कुचिनोशिमा हे तोकारा द्वीपसमूहातील सर्वात उत्तरेकडील लोकवस्ती असलेले बेट आहे. ते नाकानोशिमापासून ईशान्येस दिशेला १०. किलोमीटर (५.४ nmi) अंतरावर आहे. बेटाच्या पूर्वेकडील भागात सर्वात जास्त उंचीवर असलेले मेडके (前岳?) नावाचा भाग आहे. ज्याची समुद्रसपाटीपासून उंची ६२८.५ मीटर (२,०६२ फूट) आहे. मोएडेक (燃岳?) बेटाच्या उत्तरेकडील भागात ४२५ मीटर (१,३९४ फूट) उंच, आणि योकोडके (横岳?) बेटाच्या पश्चिम भागात ५००. मीटर (१,६४० फूट) उंच असे हे तीन ज्वालामुखी आहेत. ऐतिहासिक काळात स्फोट झाल्याची नोंद झालेली नसली तरी, मोएडेक वाफेचे उत्सर्जन करते. स.न. २००१ मध्ये जवळच्या समुद्राच्या पाण्याचा रंग बदलल्याणे ज्वालामुखीमध्ये क्रियाकलापांना चालू असल्याचे दिसून येते. स्थानिक हवामानाचे वर्गीकरण उपोष्णकटिबंधीय म्हणून केले जाते, मे ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळी हंगाम असतो.

इतिहास[संपादन]

हे बेट एकेकाळी र्युक्यु साम्राज्याचा भाग होते. इडो कालावधीत, कुचिनोशिमा सत्सुमा डोमेनचा भाग होता आणि कवानाबे जिल्ह्याचा भाग म्हणून प्रशासित होता. स.न. १८९६ मध्ये, हे बेट ओशिमा जिल्हा, कागोशिमाच्या प्रशासकीय नियंत्रणाकडे हस्तांतरित करण्यात आले. स.न १९११ पासून तोशिमा, कागोशिमा गावाचा एक भाग म्हणून प्रशासित करण्यात आले. १९४६ ते १९५२ पर्यंत, उत्तर र्युक्यु बेटांच्या तात्पुरत्या सरकारचा भाग म्हणून हे बेट युनायटेड स्टेट्सद्वारे प्रशासित होते.

या बेटावर जंगली गुरांची एक लहान आणि धोक्यात असलेली जात आहे. कुचिनोशिमा (कुचिनोशिमा-उशी) जाती, जी - मिशिमा जातीसह - जपानी मूळ गुरांच्या उरलेल्या दोन जातींपैकी एक आहे.[२][३][४] कुचिनोशिमा गुरे हे जपानमधील एकमेव जंगली गुरे नाहीत कारण नारू बेटाच्या पुढे काझुरा बेटावरदेखील जंगली गुरांचा एक छोटा समूह आहे.[५]

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ 人口 (PDF) (Japanese भाषेत). Tokara Village. Archived from the original (PDF) on 4 July 2011. 18 August 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Breed data sheet: Kuchinoshima/Japan. Domestic Animal Diversity Information System of the Food and Agriculture Organization of the United Nations. Accessed January 2017.
  3. ^ [National Institute of Agrobiological Sciences] (2005). Country Report: Japan, annex to The State of the World's Animal Genetic Resources for Food and Agriculture. Rome: Food and Agriculture Organization of the United Nations. आयएसबीएन 9789251057629. Accessed January 2017.
  4. ^ Kuchinoshima-Ushi. NODAI Genome Research Center, Tokyo University of Agriculture. Accessed January 2017.
  5. ^ 葛島(野生化した和牛のいる島)
  • नॅशनल जिओस्पेशियल इंटेलिजेंस एजन्सी (एनजीआयए). प्रोस्टार सेलिंग दिशानिर्देश २००५ जपान एन रूट. प्रोस्टार पब्लिकेशन्स (२००५).आयएसबीएन 1577856511ISBN १५७७८५६५११

बाह्य दुवे[संपादन]