कुकडीची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुकडीची लढाई २२ नोव्हेंबर १७५१ रोजी नगर जवळील कुकडी नदीच्या किनाऱ्यावर मराठे व हैदराबादचा निजाम सलाबतजंग यांच्यात झाली.

कुकडीची लढाई
मराठे-निजाम युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक २२ नोव्हेंबर १७५१
स्थान कुकडी नदी, महाराष्ट्र
परिणती मराठ्यांचा विजय
युद्धमान पक्ष
Flag of the Maratha Empire.svg मराठा साम्राज्य Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg निजाम
सेनापती
Flag of the Maratha Empire.svg नानासाहेब पेशवे
Flag of the Maratha Empire.svg हणमंतराव निंबाळकर
Flag of the Maratha Empire.svg सुभानजी थोरात
Flag of the Maratha Empire.svg धनाजी थोरात
Flag of the Maratha Empire.svg कोन्हेर त्रिंबक एकबोटे
Flag of the State of Hyderabad (18th century-1900).svg सलाबतजंग
Drapeau du régiment de la Compagnie des Indes en 1756.png जनरल बुसी
सैन्यबळ
१५,००० घोडदळ
४० तोफा
५,००० पायदळ सैनिक
२०,००० घोडदळ
६० तोफा
५,००० पायदळ सैनिक
५,००० राखीव सैनिक

पार्श्वभूमी[संपादन]

मार्च १७५१ मध्ये कृष्णा नदीच्या खोऱ्यात झालेल्या लढाईत सलाबतजंग आणि नानासाहेब पेशवे यांच्यात तह झाला. परंतु पुन्हा, १७५१ मध्ये सलाबतजंग हा मराठ्यांचे वाढते वर्चस्व थांबवण्याकरिता २५ हजाराचे सैन्य घेऊन पुण्याजवळील नगर येथे आला. सलाबतजंगला रोखण्याकरिता नानासाहेब पेशवे हे पुण्यातून सुमारे १५ हजाराची फौज घेऊन निघाले. २२ नोव्हेंबर १७५१ रोजी कुकडी नदीवर वडगाव नजीक मराठे व निजाम यांच्यात युद्ध झाले. यात निजामाला जनरल बुसी या तोफखान्याच्या प्रमुख फ्रेंच अधिकाऱ्याने मदत केली. प्रदेश ओळखीचा असल्याने मराठ्यांना या युद्धात विजय मिळवण्यात मदत झाली.

परीणाम[संपादन]

सलाबतजंगला पुणे प्रांतातून माघार घ्यावी लागली.

संदर्भ[संपादन]

  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड - १(१७५०-१७६१) – वि. का. राजवाडे, संदर्भ - १.