कियेरा नाइटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कियेरा नाइटली
जन्म २६ मार्च, १९८५ (1985-03-26) (वय: ३८)
रिचमंड अपॉन थेम्स, लंडन
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९३ - चालू
पती जेम्स राइटन (२०१३ - )

कियेरा क्रिस्टिना नाइटली (इंग्लिश: Keira Christina Knightley; २६ मार्च १९८५) ही एक ब्रिटिश सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. १९९३ सालापासून ब्रिटिश टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी नाइटलीने १९९९ सालातील स्टार वॉर्स भाग १ मध्ये एक छोटी भूमिका केली होती. २००२ सालच्या बेन्ड इट लाइक बेकहम ह्या चित्रपटानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. २००५ साली प्रदर्शित झालेल्या जेन ऑस्टेनच्या कादंबरीवर आधारित प्राइड अँड प्रेज्युडीस ह्या चित्रपटासाठी नाइटलीला ऑस्कर नामांकन मिळाले. २००३ ते २००७ दरम्यान प्रदर्शित झालेल्या पायरेट्स ऑफ द कॅरिबियन ह्या चित्रपट शृंखलेमध्ये नाइटलीने एलिझाबेथ स्वानची भूमिका केली होती.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: