किताब (नाटक)
किताब | |
लेखन | रफीक मंगलसेरी |
भाषा | मल्याळम |
देश | भारत |
प्रकार | विनोदी |
विषय | मुस्लिम समाजातील स्त्रियांसाठी समानाधिकार |
निर्मिती वर्ष | २०१८ |
निर्मिती | रफीक मंगलसेरी |
दिग्दर्शन | रफीक मंगलसेरी |
किताब (मल्याळम : കിത്താബ് / किथाब), हे एक अजान (बांग) देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका मुुुस्लिम तरुणीचे विनोदी चित्रण असलेले मल्याळम भाषेतील नाटक आहे. सामूहिक प्रार्थना करण्यासाठी मशिदीतुन देण्यात येणाऱ्या सादास अजान (बांग) असे म्हणतात, आणि सामान्यतः अजान फक्त मुस्लिम पुरुष देत असताात, ज्यांना मुअज़्ज़िन किंवा मुकरी असे म्हणतात.
ही मुलगी आपल्या समाजातील स्त्रियांवरील अत्याचार आणि दडपशाहीबद्दल नेहमी आवाज उठवत असते आणि आपल्या मैत्रिणीं सोबत नाचत, नाकारलेल्या धान्यावर त्यांचा हक्क सांगत, अजान देण्याची संधी मिळावी या मागणीसाठी, आपल्या समाजातील स्त्रियांवरील अत्याचार व दडपशाहीचा प्रश्न ती मांडते. [१][२]
पारंपरिक मुस्लिम कुटुंबात प्रचलित असलेल्या विविध विषयांवर, महिलांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव या नाटकात दाखवले गेले आहे. मुलींना योग्य आणि पोषक आहार न मिळणे, निकृष्ट शिक्षण, बहुपत्नीत्व या व अशा अनेक वैविध्यपूर्ण विषयांची चर्चा या नाटकात आहे.[३]
हे नाटक पटकथा लेखक-रफीक मंगलसेरी यांनी लिहिले आहे.[४][५][६] हे नाटक नोव्हेंबर २०१८ मध्ये भारतीय केरळ राज्यात अशा वेळी घडले जेव्हा महिला हक्क चळवळ आकारत होती. हे असे वातावरण होते ज्यात महिलांना सबरीमाला मंदिरात उपासनेचा हक्क, मुस्लिम स्त्रियांना धार्मिक समारंभात भाग घेण्याचा हक्क आणि धार्मिक ठिकाणी लैंगिक समानतेसाठी महिलांना इमाम म्हणून नियुक्त करणे, मशिदींमध्ये हजेरी लावणे आणि नमाज मध्ये समावेश इत्यादी मागण्या सुरू होत्या.[१]
प्रेरणा
[संपादन]रफिक मंगलसेरी असे नमूद करतात की त्यांचे नाटक 'किताब' थेट वांगूच्या कथेवर आधारित नव्हते, तर लेखक उन्नी आर यांच्या 'वांगू' कथेवर प्रेरित एक स्वतंत्र रूपांतरण होते. लेखक उन्नी आर यांनी मंगळसेरीच्या नाटकापासून स्वतःला दूर करत असे म्हणले की, ते त्यांच्या या मताशी सहमत नाहीत आणि मंगळसेरीच्या नाटकात त्याच्या कल्पनेच्या तुलनेत आध्यात्मिक मूल्य कमी आहेत.[७] मल्याळम दिग्दर्शक व्ही.के. प्रकाश यांचीही उन्नी आरची कथा 'वांगू' वर चित्रपट निर्मितीची स्वतंत्र योजना होती.[८]
कथानक
[संपादन]एका मुस्लिम मुलीची अशी इच्छा असते की, ती तिच्या वडिलांप्रमाणे मुअज़ज़िन बनून नमाजसाठी अजान द्यावी. ती तिच्या आईने पुरुषांसाठी तळलेली मासळी चोरते आणि त्यावर ती अशी प्रतिक्रिया व्यक्त करती की, नैतिकतेच्या दृष्टीने तिचे हे कृत्य चुकीचे नसून परमेश्वराला (अल्लाहला) सुद्धा माहीत आहे की, मुलींना पुरुषांच्या बरोबरीने पुरेसा पोषक आहार दिल्या जात नाही. तिचे वडील तिच्या या कृत्याची निंदा करून तिला समजावून सांगतात की, महिलांना प्रत्येक गोष्ट पुरुषांच्या तुलनेत निम्मी द्यायची असते. यावर ती निष्पापपणे एक मार्मिक प्रश्न करते की 'मग महिलांनी पुरुषांच्या निम्मेच कपडे घालावे का?'[९]
यापुढेही जाऊन ती वडिलांना तिची अजान द्यायची इच्छा सांगते. तिचे वडील एका मोठ्या ग्रंथाचा (किताब)चा हवाला देत तिच्या प्रश्नांचे उत्तर देता आणि ती नाटकात काम करू नये म्हणून तिला घरात कोंडतात (नाटकात पुन्हा एक नाटक). ते आपल्या मुलीला असे सांगतात की जर ती असेच वागत राहिली तर तिला स्वर्गात जागा मिळणार नाही. वडिलांच्या विरोधात जाऊन तिने नाटकात काम केल्यामुळे ते तिला मारून टाकण्यास तयार होतात. त्यावेळी तिची आई त्यांना जाणीव करून देते की ते फक्त एक मुअज्जिन नसून तिचे वडील पण आहेत. शेवटी तिचे वडील तिला अजानची परवानगी देतात आणि ती अजान देत प्रार्थना करत असताना नाटकाचा पडदा पडतो.[९]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "In Kerala's Kozhikode, a play about a girl who dreams about giving azaan call has Muslim conservatives up in arms". Firstpost. १७ एप्रिल २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Kozhikode School Withdraws Play Calling out Gender Disparity After Muslim Groups Protest". The Wire. १७ एप्रिल २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "After dropped by school Kalolsavam, 'Kithaab' to be staged across Kerala". The New Indian Express. १७ एप्रिल २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Kozhikode: SDPI, MSF up in arms against Kithab". Deccan Chronicle. 25 November 2018. १७ एप्रिल २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Play showing girl performing 'azaan' raises conservatives' ire". The Times of India. २८ एप्रिल २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ Reporter, Staff; Jayanth, A. s (5 December 2018). "Campaign for Kithaab takes off". The Hindu. ISSN 0971-751X. १३ डिसेंबर २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Controversial play 'Kitab' dropped from Kerala school art festival". OnManorama. ७ डिसेंबर २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Unni R short story Vanku to be adapted on screen by V K Prakash daughter Kavya Prakash Shabna Mohammed: വാങ്ക് വിളിക്കാൻ ആഗ്രഹിച്ച റസിയയുടെ കഥ സിനിമയാകുന്നു: ഉണ്ണി ആറിന്റെ കഥയ്ക്ക് ദൃശ്യഭാഷ്യമൊരുക്കാന് രണ്ടു പെണ്കുട്ടികള്". The Indian Express. १७ एप्रिल २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "Following protests by Muslim groups Kozhikode school withdraws students play". thenewsminute.com. २३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.