काशीबाई नवरंगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ काशीबाई नवरंगे
आयुष्य
जन्म २५ ऑक्टोबर १८७८
मृत्यू २१ ऑगस्ट १९४६
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
वडील वासुदेवराव नवरंगे
संगीत साधना
शिक्षण बी. ए, एल.एम.ॲण्ड एस.
संगीत कारकीर्द
कार्य वैद्यकीय
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
कार्य संस्था स्त्रियांची उद्योगी संस्था, ज्युव्हेनाईल कोर्टा
कारकिर्दीचा काळ इ.स. १९०७ पासुन
गौरव
विशेष उपाधी सामाजिक कार्यकर्त्या
पुरस्कार ‘जस्टीस ऑफ पीस’

काशीबाई नवरंगे ह्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. काशीबाई नवरंगे त्यांचे कुटुंब प्रार्थना समाजाच्या सावलीत विकसित झाले. तसेच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान दिले होते.

शिक्षण[संपादन]

प्रथम काशीबाई पं.रामाबींच्या शारदा सदन मध्ये होत्या. परंतु त्यानंतर त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. १८९६ मध्ये त्या मॅट्रीक पास होऊन मुंबईला विल्सन कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्या. १९०९ मध्ये बी.ए. झाल्या, पदवी मिळाली. पण त्यांना डॉक्टर व्हायचे होते. १९०६ मध्ये एल.एम.ॲण्ड एस.ची परीक्षा पास झाल्या. बी.ए. होऊन त्यानंतर डॉक्टर होणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या. १९०७ मध्ये त्यांनी भुलेश्वर येथे स्वतःचा दवाखाना सुरू केला.

पुरस्कार[संपादन]

१९२५ मध्ये सरकारने त्यांना जस्टीस ऑफ पीस हा सन्मान दिला. जे.पी. हा सन्मान मिळवणाऱ्या डॉ.काशीबाई नवरंगे या पहिल्या दक्षिणी स्त्री होत्या.

कामाचा विषय[संपादन]

प्रार्थना समाजाच्या सभासद होऊन त्यांनी विविध प्रकारचे काम सुरू केले. स्त्रियांसाठी रविवारी स्वतंत्र उपासद सभा घेण्यास त्यांनी सुरुवात केली. गरीब स्त्र्यांसाठी दुध फंडा चालविणे, मुलांना कपडे शिवून पाठविणे, निधी गोळा करणे. इ. उपक्रमांमध्ये त्या सहभागी असत. आरोग्यविषयक व्याख्याने देत. पंढरपूरच्या अनाथाश्रमाच्या त्या सहभागी होत्या. मुंबईला गर्भवती चिकित्सालय’ सुरू करून गरीब स्त्रियांची त्या मोफत तपासणी करून औषधोपचार करीत.काळाचे बदलते स्वरूप विचारात घेऊन स्त्रियांना स्वावलंबी बनविण्यासाठी काही व्यावसायिक उपक्रम त्यांनी सुरू केले. १९२२ मध्ये त्यांनी स्त्रियांची उद्योगी संस्था स्थापन केली. उद्योगगृह, पतपेढी, खरेदी-विक्री केंद्र सुरू करून स्त्रियांना विविध प्रकारची कामे करण्यास प्रोत्साहन दिले. त्याबरोबर त्या आर्य महिला समाजाचे कामही मनापासून करीत. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांना शिष्यवृती मिळावी, त्यांना ग्रंथालयासारख्या सुविधा मिळाव्यात म्हणून त्याना सतत प्रयत्न केले. १९३६ मध्ये लंडन येथे होणाऱ्या सर्वधर्म परिषदेला ब्राम्हो समाज्याच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना सन्मान पाठविले होते. त्यांच्या कार्यानेच अनेक गौरव त्यांच्याकडे चालत आले.[१] १९१८ मध्ये महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा ६० व वाढदिवस त्यांना विद्यार्थिनींनी आयोजित केला. तेव्हा डॉ.काशीबाई नवरंगे समारंभाच्या अध्यक्ष होत्या त्यांच्या हस्ते महर्षी कर्वे यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या फेलो म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.एका हिंदी स्त्रीची फेलो म्हणून प्रथमच नेमणूक करण्यात आली होती. मुंबई म्युन्सिपाल्टी स्कूल कमिटीच्या त्या सदस्य होत्या. ज्युव्हेनाईल कोर्टाच्या सल्लागार सदस्य होत्या. बॉम्बे प्रेसिडेन्सी रेफोर्मेर मंडळाच्या सदस्य होत्या. अनेक सामाजिक संस्थांशी त्या सक्रियतेने जोडलेल्या होत्त्या. प्रार्थना समाजाच्या सदस्यापासून अध्यक्षपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या त्यांनी आनंदाने स्वीकारल्या. मृत्युपूर्वी अवघी तीन वर्षे त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ६३. ISBN 978-81-7425-310-1.