चर्चा:काशीबाई नवरंगे
विषय जोडाAppearance
Latest comment: २ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic इतरत्र सापडलेला मजकूर
न्राम्हो समाज्याच्या ? कि ब्राम्हो
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]तुम्ही लिहिलेला मजकूर (खाली आहे) योग्य ते बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०२:०५, २९ ऑगस्ट २०२५ (IST)
- डॉ.काशीबाई नवरंगे ह्या डॉक्टर होत्या. त्यांचे गिरगाव परिसरातील गावदेवी भागातील एका रस्त्याला मुंबई महानगरपालिकाने नाव दिलेले आहे.तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये स्वतःचे क्लिनिक उघडणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या.
- {{माहितीचौकट व्यक्ती
- | चौकट_रुंदी =
- | नाव = डॉ. काशीबाई वासुदेवराव नवरंगे
- | चित्र =
- | चित्र_आकारमान =
- | चित्रशीर्षक =
- | चित्रशीर्षक_पर्याय =
- | जन्मनाव =
- | जन्म_दिनांक = २५ ऑक्टोबर, १८७८
- | जन्म_स्थान = मुंबई
- | मृत्यू_दिनांक =२१ ऑगस्ट १९४६
- | मृत्यू_स्थान =
- | मृत्यू_कारण =
- | कलेवर_सापडलेले_स्थान =
- | चिरविश्रांतिस्थान =
- | चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
- | निवासस्थान =
- | राष्ट्रीयत्व = भारतीय
- | टोपणनावे =
- | वांशिकत्व =
- | नागरिकत्व = भारतीय
- | शिक्षण = एल एम अँड एस
- | कॉलेज =
- | पेशा = वैद्यकीय समाजसेविका
- | कारकीर्द_काळ =
- | मालक =
- | प्रसिद्ध_कामे =
- | मूळ_गाव =
- | पगार =
- | निव्वळ_मालमत्ता =
- | उंची =
- | वजन =
- | ख्याती =
- | पदवी_हुद्दा =
- | कार्यकाळ =
- | पूर्ववर्ती =
- | परवर्ती =
- | राजकीय_पक्ष =
- | विरोधक =
- | संचालकमंडळ =
- | धर्म = हिंदू
- | जोडीदार =
- | अपत्ये =
- | वडील = वासुदेवराव बाबाजी नवरंगे
- | आई =
- | नातेवाईक =
- | पुरस्कार =जस्टीस ऑफ पीस.
- | स्वाक्षरी =
- | स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
- | संकेतस्थळ =
- | तळटिपा =
- | संकीर्ण =
- }}
- ==बालपण व शिक्षण==
- इसवी सन १८७८ मध्ये २५ ऑक्टोबर रोजी काशीबाई ह्यांचा जन्म झाला.त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेवराव बाबाजी नवरंगे असे होते. ते त्या काळातील प्रार्थना समाजातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. काशीबाई ह्यांचे शालेय शिक्षण पंडिता रमाबाई ह्यांच्या शारदा सदन येथे झाले. त्यांनी त्यांचे मँट्रिक शिक्षण पुणे येथील हुजूरपागा येथे केले. नंतर त्यांनी मुंबई येथील विल्सन महाविद्यालय येथे बी.ए. ही पदवी प्राप्त केली.इसवी सन १९०७ मध्ये त्यांनी मेडिसीन अँड सर्जरीची लायसेंटिएट एल एम अँड एस ही परीक्षा उत्तीर्ण केली.
- ==कारकीर्द==
- काशीबाई ह्यांनी एल एम अँड एस ही परीक्षा पास केल्यानंतर भुलेश्वर येथे स्वतःचा दवाखाना उघडला. मुंबई प्रेसिडेन्सीमधील स्वतःचा दवाखाना उघडणाऱ्या त्या पहिला महिला डॉक्टर ठरल्या.भारतातील महिलांसाठी त्यांनी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून भरीव योगदान दिले. त्यांनी मुंबई येथे गर्भवती स्त्रियांसाठी रुग्णालय चालू केले. त्या रुग्णालयात गरीब स्त्रियांना मोफत उपचार उपलब्ध केले. त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन सामाजिक सुधारणा कार्यात सहभाग घेतला. त्यांनी पंडिता रमाबाई ह्यांच्या आर्य महिला समाज संस्थेत सक्रीय सहभाग घेतला. इसवी सन १९१७ मध्ये त्यांनी आर्य महिला समाजाअंतर्गत स्तनदा मातांसाठी दूध निधी सुरू केला. त्याद्वारे गरीब स्त्रियांना मोफत दूध उपलब्ध केले. त्यांनी गरजू मुलांना कपडे पुरवले. त्यांनी स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी रविवारी महिलांच्या बैठका घेतल्या. मुंबई येथील स्त्री बोधे आणि सामाजिक प्रगती च्या त्या कमिटी सदस्य होत्या.त्यांनी [[लेडी ऑनररी प्रेसिडेन्सी मँजिस्ट्रेट आणि मुंबई येथील बाल न्यायालय समुपदेशक म्हणूनही काम केले.प्रार्थना समाजाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.इसवी सन १९३४ मध्ये त्यांनी बिहार येथे झालेल्या भुकंपाच्या समयी महिलांना उपचार करणाऱ्या स्वयंसेवक तुकडीचे नेतृत्व केले. त्यांनी एक महिना बिहार येथे खेड्यापाड्यात जाऊन वैद्यकीय सेवा केली.
- ==पुरस्कार==
- काशीबाई ह्यांना मुंबई युनिव्हर्सिटी चे फेलो म्हणून गौरविण्यात आले.
- त्यांनी केलेल्या वैद्यकीय, सामाजिक सुधारणा आणि शिक्षणातील कार्याबद्दल त्यांना जस्टीस ऑफ पीस हा पुरस्कार मिळाला.
- आर्य महिला समाजच्या महिला वसतिगृहाला डॉ. काशीबाई नवरंगे मेमोरियल वसतिगृह हे नाव देण्यात आले आहे.
- मुंबई महानगरपालिकेने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल गिरगावातल्या गावदेवी परिसरात असलेल्या पूर्वीच्या अलेक्झांड्रा रोड चे नाव डॉ. काशीबाई नवरंगे मार्ग असे केले.
- ==मृत्यू==
- इसवी सन १९४६ मध्ये २१ ऑगस्ट रोजी त्यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.
- ==मुंबई महानगरपालिका==
- मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या स्मरणार्थ गिरगावात असलेल्या गावदेवी परिसरात एका रस्त्याला डॉ.काशीबाई नवरंगेमार्ग असे नाव दिलेले आहे.[१]
- ==संदर्भ व नोंदी==
- अभय नातू (चर्चा) ०२:०८, २९ ऑगस्ट २०२५ (IST)
- ^ महाराष्ट्र टाईम्स,वसई विरार पुरवणी, मंगळवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ लेखन-रिद्धी जोशी -इतिहासाच्या प्राध्यापिका.