कालनिर्णय
Appearance
कालनिर्णय | |
प्रकार | खाजगी |
---|---|
उद्योग क्षेत्र | प्रकाशन |
स्थापना | इ.स. १९७३ |
संस्थापक | जयंत शिवराम साळगांवकर |
मुख्यालय | मुंबई, भारत |
कार्यालयांची संख्या | २ |
सेवांतर्गत प्रदेश | भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | जयराज साळगावकर (सहसंस्थापक) |
उत्पादने | दिनदर्शिका |
सेवा | पंचांग, कुंडली, मुहूर्त |
कर्मचारी | १५० (मार्च ३१, २०१७ रोजी) |
संकेतस्थळ | कालनिर्णय.कॉम |
कालनिर्णय दिनदर्शिका ही महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दिनदर्शिका आहे. रोजचे पंचांग, महत्त्वाचे दिनविशेष सोप्या भाषेत यात नमूद केलेल्या असतात. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक मागील पानावर नामांकित लेखकांचे लेख, स्वयंपाक टिप्स, रेल्वे वेळापत्रक, मासिक राशिभविष्य, इत्यादी वाचता येते. वि. वा. शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, दुर्गा भागवत, जयवंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, शान्ता शेळके,वपु काळे इत्यादी सुप्रसिद्ध लेखकांनी तसेच सचिन तेंडुलकर,माधुरी दीक्षित,सुनील गावस्कर, शरद पवार यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या दिनदर्शिकेसाठी लेखन केले आहे.