कांदे (शिराळा)
?कांदे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिराळा |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कांदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हे एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील गाव आहे. कांदे हे गाव वारणा नदीकाठी वसलेले समृद गाव म्हणून ओळखले जाते ,सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील साधारण ५००० लोकवस्ती असलेले गाव असलेले दिसते. या गावी जाण्यासाठी प्रामुख्याने सांगली इस्लामपूर शिराळा मार्गे कांदे हा प्रवास साधारण ८० कि.मी. आहे. तर पुणे सातारा कराड पेठनाका शिराळा कांदे साधारण २३० ते २५० कि.मी.च्या आसपास आहे. तर या व्यतिरिक्त कोल्हापूर वरून बोरपाडळे आरळे सातवे सावर्डे मार्गे कांदे असेही ४० कि. मी. जाता येते. कांदे गावाचे ग्रामदेवत जोतीर्लिग आहे. ताशेच वारणेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे . त्या ठिकाणी प्रभू श्री राम येऊन गेल्याची आख्यायीका असल्यामुळे या मंद्दीर परिसरास रामेश्वर माळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, नागोबाचे मंदिर, लक्ष्मी मंदिर, बिरदेव मंदिर इत्यादी मंदिर पहावयास मिळतात. कांदे गावात गणेश चतुर्थी मोठ्या थाटात साजरी केली जाते, त्यात प्र्मुक्याने अष्टविनायक विग्न्हार्ता गणेश मंडळाची ९ फुटी शाडूची मूर्ती आकर्षक ठरते व त्याच बरोबरीने येणार सन दुर्गामाता गेले 11 वर्ष झाले भगवे वादळ दुर्गामाता मंडळाची दुर्गादेवी गावची शोभा वाढवते.
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.