कसाई बुलबुल
Appearance
कसाई बुलबुल,अथवा खाजुरखाई (शास्त्रीय नाव:hypocolius ampelinus; इंग्लिश:grey hypocolius, shirike-bulbul; संस्कृत:खाजुरप्रिय; तेलुगु:किरीती–पिगली पिटा; कन्नड:कसाई-कोत्तुग) हा एक पक्षी आहे.
कसाई बुलबुल ह्या पक्षाचा नीळा राखी असा रंग आहे व त्या पक्ष्याकडे पाहिल्यावर खाटिक किंवा बुलबुल पक्षाची आठवण होते. त्याचे डोळे,कान आणि चोचीच्या वरच्या भागाला जोडणारा काळा पट्टा मानेवरून जातो व त्याच्या पंखांची पिसे काळी असून त्यांची टोके पांढरी असतात.कसाई बुलबुलची निळी राखी रंगाची लांब शेपटी आणि तिच्या मध्यावर काळी पट्टी असते. कारण मादीला डोके आणि मानेवरची काळी पट्टी नसते.
कसाई बुलबुलचे वितरण बलुचिस्तान, सिंध, कच्छ आणि भारतात आहे .
कसाई बुलबुल जून ते जुलै या काळात आढळतो .
कसाई बुलबुल हे पानगळीची विरळ, झुडपी जंगले, व निम-वाळवंटी प्रदेशात राहतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली