Jump to content

रामचंद्र द्विवेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कवी प्रदीप या पानावरून पुनर्निर्देशित)
कवी प्रदीप
जन्म रामचंद्र नारायणजी द्विवेदी
६ फेब्रुवारी, १९१५ (1915-02-06)
बडनगर, सेंट्रल इंडिया एजन्सी, ब्रिटिश भारत (सध्या मध्यप्रदेशात)
मृत्यू ११ डिसेंबर, १९९८ (वय ८३)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
पेशा कवी
कारकिर्दीचा काळ १९३९-१९९७

रामचंद्र द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप (६ फेब्रुवारी, इ.स. १९१५; बडनगर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत - ११ डिसेंबर, इ.स. १९९८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी आणि गायक होते.

जीवन

[संपादन]

रामचंद्र द्विवेदींचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगरउज्जैन) येथे झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बॉंबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणाऱ्या बॉंबहल्ल्यांमुळे ब्रिटिशांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते[ संदर्भ हवा ]. कवी प्रदीप यांच्या अटकेचे वॉरंट निघणार त्याआधीच ते गीत इतक्या लोकांच्या कानी पडले आणि असंख्य मुखांतून गायले जाऊ लागले, की अटक होताहोता टळली. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते.

कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते.

कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते.

हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथ्लेच एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. आधी आशा भोसले हे गाणे गाणार होत्या, पण संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी ते लता मंगेशकरांना दिले.

कवी प्रदीप यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गीताबद्दल मिळणाऱ्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळवून दिला. २५ ऑगस्ट २००५ रोजी एच.एम.व्ही कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या संस्थेला दहा लाख रुपये दिले.[ संदर्भ हवा ].

कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले.

गाजलेली निवडक गीते

[संपादन]
  • अब तेरा सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया (किस्मत)
  • आओ बच्चों तुम्हे दिखाएॅं झॉंखी हिंदुस्तान की (जागृति, गायकः प्रदीप)
  • आज आशिया के लोगों का काफिला चला (काफिला)
  • आज मौसम सलोना सलोना रे (झूला)
  • आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो ये हिंदुस्तान हमारा है (चित्रपट : किस्मत)
  • इन्सान का इन्सान से हो भाई चारा (पैगाम)
  • ऊपर गगन विशाल (मशाल)
  • ऐ मेरे वतन के लोगों, जरा ऑंख मे भरलो पानी (गीत)
  • ओ अमीरों के परमेश्वर (पैगाम)
  • कान्हा बजाये बांसरी और ग्वाले... (नास्तिक)
  • काहे को बिसरा हरी नाम, ओ माटी के पुतले (चक्रधारी)
  • कोई लाख करे चतुराई, हरी का नाम रहे रे भाई (चंडी पूजा)
  • खींचो कमान खींचो (अंजन)
  • गगन झन झना रहा (नास्तिक)
  • घर घर में दिवाली है मेरे घर में अन्धेरा (किस्मत)
  • चना जोर गरम बाबू (बंधन)
  • चल चल रे नौजवान (बंधन)
  • चल मुसाफिर चल (कभी धूप कभी छॉंव)
  • चलो चले मॉं (जागृति
  • जय जय नारायण हरी हरी (हरिदर्शन)
  • जय जय राम रघूराई (नास्तिक)
  • झूले के संग झूलों (झूला)
  • तेरे द्वार खडा भगवान (वामन अवतार)
  • दूसरों का दुखड़ा दूर करनेवाले
  • देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायकः प्रदीप)
  • दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल (जागृति)
  • धीरे धीरे आ रे बादल, धीरे धीरे आ (किस्मत)
  • नई उमर की कलियॉं तुमको देख रही दुनियॉं सारी (तलाक)
  • नाचो नाचो प्यारे मन के मोर (पुनर्मिलन)
  • ना जाने किधर आज मेरी नाव चली रे (झूला)
  • पपीहा रे, पपीहा रे, मेरे पियासे (किस्मत)
  • पिंजड़े के पंछी रे, तेरा दर्द न जाने कोय (नागमणि; गायकः प्रदीप)
  • पियू पियू बोल प्राण पपीहे (बंधन)
  • प्रभू के भरोसे हाको गाडी (हरिदर्शन)
  • बिगुल बज रहा आजादी का (तलाक)
  • भारत के लिये भगवान का एक वरदान है गंगा (हर हर गंगे)
  • मदद करो ऐ संतोषी माता (जय संतोषी मॉं)
  • मारने वाले है भगवान बचाने वाले है भगवान (हरिदर्शन)
  • मुखड़ा देख रे प्राणी जरा दर्पन में (दो बहन)
  • मेरे बिछडे हुए साथी (झूला)
  • मैं तो आरती उतारूॅं रे संतोषी माता की (जय संतोषी मॉं)
  • मैं तो दिल्ली से दुल्हन लाया रे (झूला)
  • राम भरोसे मेरी गाडी (गर्ल्स स्कूल)
  • रुकना सको तो जाओ (बंधन)
  • सॉंवरियॉं रे अपनी मीरा को भूल न जाना (ऑंचल)
  • सूनी पडी रे सितार (कंगन)
  • हम लाएॅं हैं तूफान से कश्ती निकाल के (चित्रपट: जागृति)
  • हमने जगत की अजब तसवीर देखी
  • हर हर महादेव, अल्ला हो अकबर (चल चल रे नौजवान)

पुरस्कार

[संपादन]

१७०० गाणी लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांना आयुष्यभर अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही:

बाह्य दुवे

[संपादन]
  • "रामचंद्र द्विवेदी यांच्या कविता" (हिंदी भाषेत). 2013-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-21 रोजी पाहिले.