कवठे यमाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भोगोलिक स्थान आणि लोकसंख्या[संपादन]

कवठे हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ५८१४ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. त्याच्या सर्वात जवळचे शहर शिरूर हे २८ किलोमीटर अंतरावर आहे. २०११च्या जनगणनेनुसार कवठे गावात १३९२ कुटुंबे असून, ३६३७ पुरुष आणि ३५४७ स्त्रियांसह गावाची एकूण लोकसंख्या ७१८४ आहे. गावात अनुसूचित जातीचे ४०८ जण असून, अनुसूचित जमातीचे १९२ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५५५५६९ [१] आहे.


कला आणि कलावंत[संपादन]

कवठे गाव हे ऐतेहासिक वारसा लाभलेले गाव असून येथे मराठा सरदार श्रीमंत पवार यांनी अठराव्या शतकात उभारलेली आणि अजून ही सुस्थितीत असलली एक गढी (राजवाडा) आहे. साहजिकच, कला आणि कलावंतांना प्रोत्साहन देणारे हे गाव महाराष्ट्र राज्यात आपलं एक वेगळे स्थान टिकवून आहे. प्रसिद्ध तमाशा कलावंत भाऊ बापू मांग नारायणगावकर, विठ्ठल कवठेकर, गंगाराम बुआ रेणके अशी नामवंत तमाशा कलाकार, फड मालक या मातीत जन्मले आणि प्रसिद्ध पावले. आपल्या शृंगारिक लावण्यांसाठी आणि लोकजागृती करणाऱ्या लघुनाट्य लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन कवठेकर हे सुद्धा याच गावचे. महाराष्ट्र शासना तर्फे तमाशा कला क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च असा 'विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' मिळवणारे दोन दिग्गज श्री गंगाराम रेणके आणि लोकशाहीर बशीर मोमीन उर्फ बी. के. मोमीन कवठेकर येथेच राहतात.

साक्षरता[संपादन]

  • गावाची एकूण साक्षर लोकसंख्या: ४९१० (६८.३५%)
  • गावातील साक्षर पुरुषांची संख्या: २७३२ (७५.१२%)
  • गावातील साक्षर स्त्रियांची संख्या: २१७८ (६१.४%)
  1. ^ http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html