कर्तारसिंग दुग्गल
कर्तार सिंग दुग्गल (जन्म इ.स. १९१७ - मॄत्यू जानेवारी २६, इ.स. २०१२[१]) हे एक पंजाबी भाषेतील कवी, कादंबरीकार, व लघुकथा लेखक आहेत.[२].
कर्तार सिंग यांचा जन्म ब्रिटिश भारतात रावळपिंडी जिल्ह्यातील धमाल या गावी झाला.[३] त्यांनी पंजाबीसह इंग्रजी, उर्दू, हिंदी इत्यादी भाषांमध्येही लिखाण केले आहे. त्यांच्या पुस्तकांची अनेक भारतीय व परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. फिलॉसॉफी ऍंड फेथ ऑफ सिखिसम् या त्यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आ. ह. साळुंखे यांनी शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणिवा या नावाने केला आहे.
कर्तार सिंग दुग्गल हे आकाशवाणीचे संचालक होते. नॅशनल बूक ट्रस्ट, इंडियाचेही ते भूतपूर्व संचालक होते. त्यांच्या लिखाणासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात रशियन सरकारच्या नेहरू पारितोषिकाचा सामावेश आहे.[२] भारत सरकारने इ.स. १९८८ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. इ.स. १९९७ साली त्यांना साहित्य अकादमी फेलोशीप देण्यात आली.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2012-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-27 रोजी पाहिले.
- ^ a b लेखक परिचय, शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणिवा, नॅशनल बूक ट्रस्ट, इंडिया; आय. एस. बी. एन. ८१-२३७-४६६६-०
- ^ लायब्ररी ऑफ काँग्रेस येथे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)