कर्जुले हरेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्जुले हरेश्वर
जिल्हा अहमदनगर
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ३५०० अंदाजे
२००१
दूरध्वनी संकेतांक +०२४८८
टपाल संकेतांक ४१४३०४
वाहन संकेतांक महा-१६, महा-१७


कर्जुले हरेश्वर हे गांव पहिले कर्जुले हर्या म्हणून ओळखले जात होते. कर्जुले हरेश्वर हे अहमदनगर जिल्यातील एक छोटे गांव आहे. हे गांव टाकळी ढोकेश्वर ह्या गावाशेजारी पश्चिमेला ७ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. हे गांव मुंबईकरांचे गांव म्हणूनही ओळखले जाते. कुटुंबातील बरीच लोक मुंबईला वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात काम करत आहेत.


शिक्षण[संपादन]

प्राथमिक शाळा[संपादन]

 • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

ह्या शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मिळते.

माध्यमिक विद्यालय[संपादन]

 • श्री हरेश्वर माध्यमिक विद्यालय

ह्या माध्यमिक विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मिळते. हे शिक्षण मराठी किंवा सेमी-मराठी(मराठी आणि इंग्लिश) ह्या माध्यमामध्ये घेतले जावू शकते.

उच्च माध्यमिक विद्यालय[संपादन]

 • श्री हरेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय (वानिज्ज शाखा)

ह्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावी आणि बारावीचे वानिज्ज शाखेचे शिक्षण मिळते.

शिक्षण संस्था[संपादन]

 • श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ

कर्जुले हरेश्वर ग्रामस्थांच्या मदतीने कै. श्री. विष्णू शिंदे ह्यांनी गावामध्ये "श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ" ह्या शिक्षण संस्थेची १९७८ मध्ये स्थापना केली. श्री. शिवाजीराव आंधळे हे ह्या संस्थेचे सचिव म्हणून काम करत आहेत. त्यांचे ह्या शिक्षण संस्थेच्या विकासामध्ये मोलाचे योगदान आहे.

हि शिक्षण संस्था पारनेर तालुकात कार्यरत असून संस्थेची खालील माध्यमिक विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालये आहेत.

 • श्री हरेश्वर माध्यमिक विद्यालय, कर्जुले हरेश्वर
 • श्री हरेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय (वानिज्ज शाखा), कर्जुले हरेश्वर
 • नूतन माध्यमिक विद्यालय, खडकवाडी
 • नूतन उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान आणि कला शाखा), खडकवाडी
 • मलवीर माध्यमिक विद्यालय, पळशी
 • रत्नेश्वर माध्यमिक विद्यालय, कोहकडी


धर्म[संपादन]

कर्जुले हरेश्वर मधील बहुतांशी लोकसंख्या ही हिंदू धर्मी आहेत. तसेच गावामध्ये काही मुस्लिम पण आहेत. गावात अनेक मंदिरे तसेच एक मज्जीद आहे. गावातील श्री हरेश्वर मंदिरावरून गावाचे नाव कर्जुले हरेश्वर असे पडले आहे. श्री हरेश्वर हे गावाचे ग्रामदैवत आहे.

मंदिरे[संपादन]

 • श्री हरेश्वर मंदिर
 • श्री गणपती मंदिर
 • श्री हनुमान मंदिर
 • श्री मुक्ताई मंदिर
 • श्री महादेव मंदिर (खुड्यातील)
 • कमळजा माता मंदिर, (मांडओहळ)

पर्यटन स्थळे[संपादन]

 • मांडओहळ धरण
 • खाजीपीर डोंगर
 • पाचीअंबे तळे
 • बी टी फाटा
 • रुईचोंडा धबधबा