टाकळी ढोकेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टाकळी ढोकेश्वर हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुकातील गाव आहे. या गावाहून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो.

ढोकेश्वर मंदिर[संपादन]

या गावाजवळ ढोकेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे. गावाच्या मंदिराकडे जाण्यासाठी वाकडी वळणदार वाट आहे. हे मंदिर डोंगरात कोरलेले आहे. या ठिकाणी गोड पाण्याचे टाके आहे. यामंदिरावरून या गावाला टाकळी ढोकेश्वर असे नाव पडले आहे. मंदिरात महादेवाची खूप मोठी आकर्षक पिंड आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात तीसऱ्या सोमवारी व शिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

जवाहर नवोदय विद्यालय[संपादन]

जवाहर नवोदय विद्यालय हे मानव संसाधन विकास मंत्रालयाव्दारे चालवले जाते. येथील विद्यालय इ.स. १९८८साली सुरु झाले. विद्यालय गावच्या पश्चिमेला आहे.

अहमदनगर