कंदलगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कंदलगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कंदलगाव हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील गाव आहे. हे गाव सोलापूरपासून २४ किलोमीटर (मार्गे भय्या चौक, -> मरीआई, -> डोणगाव, -> तेलगाव ) व ३२ किलो मीटर (मार्गे सात रस्ता, -> विजापूर नाका, -> नेहरू नगर, -> सोरेगाव, -> हत्तूर, -> ११ मैल, -> १३ मैल, -> मंद्रूप, -> येळेगाव) वर आहे.

   गावात श्री. केदारेश्वराचे एतिहासीक असे हेमाडपंती पुरातन मंदिर असून या देवाची दर वर्षी हनुमान जयंती निमित्त एप्रिल महिन्यात यात्रा उत्सव असतो. यात्रे निमित्त परिसरातील नातेवाईक गावी येतात. सदर यात्रेत कुस्त्या व कन्नड नाटक यांचे आयोजन केले जाते. सदर यात्रा हि सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेशी साधर्म्य असणारी असते.
   
  कंदलगांव येथे बँक ऑफ इंडिया हि राष्ट्रीकृत शाखा आसून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे आहे. तसेच लोकमंगल उद्योग समुहाची लोकमंगल सहकारी बँके ची शाखा गावात आहे. गावात मुला मुलींची जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आहे. कंदलगांव येथे जीवन ज्योत प्रशाला ही माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला व महाविद्यालय आहे. सदर संस्थेचे संस्थापक हे कै. दीनानाथ कमळे हे आहेत ते कमळेगुरुजी या नावानी नामांकित होते. तसेच ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ही होते. कंदलगांव येथे एक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, व पशुचिकीस्तालय पण आहे. कंदलगांव से दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिसरे मोठे गाव असून गावाची लोकसंख्या अंदाजे बारा हजार आहे. 
 कंदलगांव येथे अनेक सामाजिक संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या पैकी एकता प्रतिष्ठान कंदलगांव ही सामाजिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. सदर संस्थेचे संस्थापक हे नरेश शिंदे हे आहेत.