कंदलगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कंदलगाव हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील गाव आहे. हे गाव सोलापूरपासून २४ किलोमीटर (मार्गे भय्या चौक, -> मरीआई, -> डोणगाव, -> तेलगाव ) व ३२ किलो मीटर (मार्गे सात रस्ता, -> विजापूर नाका, -> नेहरू नगर, -> सोरेगाव, -> हत्तूर, -> ११ मैल, -> १३ मैल, -> मंद्रूप, -> येळेगाव) वर आहे.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


   गावात श्री. केदारेश्वराचे एतिहासीक असे हेमाडपंती पुरातन मंदिर असून या देवाची दर वर्षी हनुमान जयंती निमित्त एप्रिल महिन्यात यात्रा उत्सव असतो. यात्रे निमित्त परिसरातील नातेवाईक गावी येतात. सदर यात्रेत कुस्त्या व कन्नड नाटक यांचे आयोजन केले जाते. सदर यात्रा हि सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेशी साधर्म्य असणारी असते.
   
  कंदलगांव येथे बँक ऑफ इंडिया हि राष्ट्रीकृत शाखा आसून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे आहे. तसेच लोकमंगल उद्योग समुहाची लोकमंगल सहकारी बँके ची शाखा गावात आहे. गावात मुला मुलींची जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आहे. कंदलगांव येथे जीवन ज्योत प्रशाला ही माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला व महाविद्यालय आहे. सदर संस्थेचे संस्थापक हे कै. दीनानाथ कमळे हे आहेत ते कमळेगुरुजी या नावानी नामांकित होते. तसेच ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ही होते. कंदलगांव येथे एक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, व पशुचिकीस्तालय पण आहे. कंदलगांव से दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिसरे मोठे गाव असून गावाची लोकसंख्या अंदाजे बारा हजार आहे. 
 कंदलगांव येथे अनेक सामाजिक संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या पैकी एकता प्रतिष्ठान कंदलगांव ही सामाजिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. सदर संस्थेचे संस्थापक नरेश विजयकुमार शिंदेे हे आहेत. सदर संस्थेेने वृक्ष संवर्धन, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, विद्यार्थी शैक्षणिक पालकत्व, आसे मोलाचे उपक्रम राबवत सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक कार्याच्या शिरपेचात आपले मयुरपंख खोचले आहे. एकता प्रतिष्ठान कंदलगांवहि सामाजिक संस्था गेली दहा वर्षे सामाजिक उपक्रम राबवण्यात व्यस्त आहे. या सामाजिक संस्थे च्या माध्यमातून शेकडो झाडांचे संगोपन व संवर्धन विद्यार्थी व शालेय सहभागातुन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व अग्रणी प्रसार माध्यमांनी या संस्थेच्या कार्याची भरभरुन प्रसिद्धी केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात कंदलगांव व परिसरात ग्रीनझोन मानवनिर्मित वनराई निर्माण करण्याचे महत्व पुर्ण कार्य हाती घेतले आहे.