Jump to content

ऐझॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऐजॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
ऐझॉल
भारतामधील शहर

मिझोरम विद्यापीठ, सॉलोमन चर्च व ऐझॉल विमानतळ
ऐझॉल is located in मिझोरम
ऐझॉल
ऐझॉल
ऐझॉलचे मिझोरममधील स्थान
ऐझॉल is located in भारत
ऐझॉल
ऐझॉल
ऐझॉलचे भारतमधील स्थान

गुणक: 23°43′38″N 92°43′4″E / 23.72722°N 92.71778°E / 23.72722; 92.71778

देश भारत ध्वज भारत
राज्य मिझोरम
जिल्हा ऐझॉल जिल्हा
क्षेत्रफळ ९ चौ. किमी (३.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,७१५ फूट (१,१३२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,९३,४१६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
aizawl.nic.in


ऐझॉल हे भारत देशाच्या मिझोरम राज्याच्या राजधानीचे शहर व ईशान्य भारतामधील एक प्रमुख शहर आहे. ऐझॉल शहर मिझोरमच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ३,७१५ फूट इतक्या उंचीवर वसले आहे. २०११ साली सुमारे ३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ऐझॉल मिझोरमचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र आहे. ऐझॉलमध्ये मिझोरम राज्य सरकारचे कार्यालय, विधानसभाऐझॉल उच्च न्यायालय स्थित आहेत. येथे प्रामुख्याने मिझो वंशाच्या लोकांचे वास्तव्य असून मिझो ही मिझोरमची एक राजकीय भाषा आहे.

इतिहास

[संपादन]

ऐझॉल गावाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात केली गेली व येथे १८९० च्या दशकात ब्रिटिशांनी एक किल्ला बांधला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऐझॉल व जवळची खेडी एकत्रित करून ऐझोल शहराची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासूनच येथे ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला होता. आजच्या घडीला ऐझॉलमधील ९० टक्क्याहून अधिक रहिवासी ख्रिस्ती धर्मीय आहेत.

वाहतूक

[संपादन]

लेंगपुई विमानतळ हा ऐझॉल व मिझोरमला उर्वरित भारतासोबत जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. येथून दिल्ली, कोलकातागुवाहाटी ह्या प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग ऐझॉलला आगरताळा, इम्फाळसिलचरसोबत जोडतात. बैराबी हे मिझोरममधील एकमेव रेल्वे स्थानक ऐझॉलच्या ८० किमी उत्तरेस स्थित आहे. बैराबी ते ऐझॉल रेल्वेमार्गाचे काम प्रस्तावित आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत