एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मुलापाडू, कृष्णा जिल्हा, आंध्र प्रदेश |
गुणक | 16°36′32″N 80°28′13″E / 16.6088°N 80.4702°Eगुणक: 16°36′32″N 80°28′13″E / 16.6088°N 80.4702°E |
स्थापना | ३० मे २०१६ |
मालक | कृष्णा जिल्हा क्रिकेट असोसिएशन |
प्रचालक | आंध्रा क्रिकेट असोसिएशन |
| |
शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१७ स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान (किंवा आंध्रा क्रिकेट असोसिएशन-क्रिष्णा डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन मैदान) हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यामधील दोन क्रिकेट मैदानांचे सामाईक नाव आहे. ते विजयवाडा जवळील, कृष्णा जिल्ह्यातील, मुलापाडू ह्या गावात वसलेले आहे.[१] ते कृष्णा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (एसीए-केडीसीए) मालकिचे असून, आंध्रा क्रिकेट असोसिएशनच्या आखत्यारित येते. [२]
३० मे २०१६ रोजी अनुराग ठाकूर यांनी मैदानाचे उद्घाटन केले.[३] दक्षिणेच्या मैदानाचे नाव चुक्कापल्ली पित्चैया मैदान आणि उत्तरेकडील मैदानाचे नाव देविनेनी वेंकट रमणा-प्रनीता मैदान असे ठेवण्यात आले, ज्यांचे अधिकृत उद्धाटन १० नोव्हेंबर १९१६ रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते झाले.[४]
स्पर्धा
[संपादन]१० ते १६ नोव्हेंबर २०१६ दरम्यान, मैदानावर २०१४-१६ आयसीसी महिला चॅंपियनशिपचा एक भाग म्हणून भारतीय महिला आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघादरम्यान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळवली गेली.[५]
स्थानिक स्पर्धा
[संपादन]मैदानावर याआधी, केडीसीए पॉवर लीग चषक आणि फ्युचर कप ह्यासारख्या स्पर्धा झाल्या आहेत.[६][७]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ श्रीधरन, जे आर. "मुलापाडू हे क्रिकेट, पर्यटनाचे केंद्र असेल: गंगाराजू". द हिंदू (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एम् एस् के हेल्प्ड एसीए ग्रो इन स्ट्रेचर: गंगा राजू". द न्यू इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2016-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआय अध्यक्षांच्या हास्ते मुलापाडू क्रिकेट केंद्राचे उद्घाटन". द न्यू इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2016-09-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मुलापाडू येथील एसीए-केडीसीए क्रिकेट मैदानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत, वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय मालिकेने मुलापाडू मैदानाचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण". द न्यू इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एव्हरेस्ट विन्स द समिट क्लॅश". द हिंदू (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "फ्युचर कप क्रिकेट टुर्नी बिगीन्स ॲट मंगलागिरी". द हिंदू (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.