एलिझाबेथ वूडव्हिल
Queen consort of England | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Elizabeth Woodville |
---|---|
जन्म तारीख | c. इ.स. १४३७ Grafton Regis |
मृत्यू तारीख | जून ८, इ.स. १४९२ Bermondsey |
चिरविश्रांतीस्थान |
|
नागरिकत्व |
|
व्यवसाय |
|
उत्कृष्ट पदवी |
|
कुटुंब |
|
वडील |
|
आई |
|
भावंडे |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
एलिझाबेथ वुडविले (१४३७ - ८ जून १४९२)[१] नंतर डेम एलिझाबेथ ग्रे म्हणून ओळखली जाणारी ही इंग्लंडची राणी होती. १ मे १४६४ रोजी राजा एडवर्ड चौथा सोबत लग्न झाल्यापासून ३ ऑक्टोबर १४७० रोजी एडवर्डची पदच्युत होईपर्यंत ती राणी होती. त्यानंतर ११ एप्रिल १४७१ रोजी एडवर्डने पुन्हा सिंहासन मिळवल्यापासून ९ एप्रिल १४८३ रोजी त्याचा मृत्यू होईपर्यंत ती राणी राहिली. १४५५ आणि १४८७ च्या दरम्यान लँकॅस्ट्रियन आणि यॉर्किस्ट गटांमधील राजवंशीय गृहयुद्ध, वॉर्स ऑफ द रोझेसमधील ती एक प्रमुख व्यक्ती होती.
तिच्या जन्माच्या वेळी, एलिझाबेथचे कुटुंब इंग्रजी सामाजिक पदानुक्रमात मध्यम दर्जाचे होते. तिची आई, लक्झेंबर्गची जॅक्वेटा, पूर्वी राजा हेन्री सहाव्याची काकू होती आणि सेंट-पोलच्या काउंट पीटर पहिल्या ची मुलगी होती. एलिझाबेथचे पहिले लग्न हाऊस ऑफ लँकेस्टरचे समर्थक, ग्रोबीचे जॉन ग्रे यांच्याशी झाले होते. एलिझाबेथला दोन मुलांची आई असताना सेंट अल्बन्सच्या दुसऱ्या लढाईत तो मरण पावला.
एलिझाबेथचा एडवर्ड चतुर्थाशी झालेला दुसरा विवाह एक वादाचे कारण बनले. एलिझाबेथ तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती परंतु ती किरकोळ कुटुंबातून आली होती ज्यात कोणतीही मोठी संपत्ती नव्हती आणि त्यांचे लग्न गुप्तपणे झाले. नॉर्मन विजयानंतर एडवर्ड हा इंग्लंडचा पहिला राजा होता ज्याने त्याच्या प्रजेतील एकाशी लग्न केले होते,[२][३] आणि एलिझाबेथ ही राणीचा मुकुट धारण करणारी पहिली सामान्य जनतेतील महिला होती.
१४८३ मध्ये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, एलिझाबेथ राजकीयदृष्ट्या प्रभावशाली राहिली. तिचा मुलगा, एडवर्ड पाचवा हा इंग्लंडचा राजाघोषित झाला. तरी तिचा मेहुणा, रिचर्ड तिसरा याने त्यांना पदच्युत केले . एडवर्ड आणि त्याचा धाकटा भाऊ हे दोघेही नंतर लगेचच गायब झाले आणि त्यांची हत्या झाली असावी असे मानले जाते. एलिझाबेथने नंतर १४८५ मध्ये हेन्री सातवा च्या राज्यारोहणात महत्त्वाची भूमिका बजावली.
सातव्या हेन्रीने एलिझाबेथची सर्वात मोठी मुलगी, यॉर्कच्या एलिझाबेथशी लग्न केले, ज्याने ह्या दोन घराण्यांमधील युद्धे संपवली आणि ट्यूडर राजवंशाची स्थापना केली. तिच्या मुलीद्वारे, एलिझाबेथ वुडविले भविष्यातील हेन्री आठव्याची आजी होती. एलिझाबेथला भाग पाडले गेले की त्यांनी हेन्री सातव्याची आई, लेडी मार्गारेट ब्यूफोर्ट यांना अग्रगण्य मानावे. त्यानंतर त्यांची राजकीय पटलावरून निवृत्ती झाली व बाकी माहिती पण अस्पष्ट राहिली.[४][५]
आपत्ये
[संपादन]जॉन ग्रे सोबत
[संपादन]- थॉमस ग्रे - (अर्ल ऑफ हंटिंगडन, मार्क्वेस ऑफ डोर्सेट आणि लॉर्ड फेरर्स डी ग्रोबी) (जन्म १४५५ - मृत्यू २० सप्टेंबर १५०१) [६]
- रिचर्ड ग्रे (जन्म १४५७ - मृत्यू २५ जून १४८३)
राजा एडवर्ड चौथा सोबत
[संपादन]- यॉर्कची एलिझाबेथ (जन्म ११ फेब्रुवारी १४६६ - मृत्यू ११ फेब्रुवारी १५०३), हेन्री सातच्याची पत्नी म्हणून इंग्लंडची राणी (राज्य १४८५-१५०९) पत्नी. नंतर राजा हेन्री आठव्याची आई (राज्य १५०९-१५४७).
- मेरी ऑफ यॉर्क (जन्म ११ ऑगस्ट १४६७ - मृत्यू २३ मे १४८२), सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर कॅसलमध्ये पुरण्यात आले.
- सेसिली ऑफ यॉर्क (२० मार्च १४६९ - मृत्यू २४ ऑगस्ट १५०७), व्हिस्काउंटेस वेल्स
- इंग्लंडचा एडवर्ड पाचवा (२ नोव्हेंबर १४७० - मृत्यू १४८३), टॉवरमधील राजकुमारांपैकी एक
- मार्गारेट ऑफ यॉर्क (जन्म १० एप्रिल १४७२ - मृत्यू ११ डिसेंबर १४७२), वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये पुरण्यात आले
- रिचर्ड, ड्यूक ऑफ यॉर्क (जन्म १७ ऑगस्ट १४७३ - मृत्यू १४८३), टॉवरमधील राजकुमारांपैकी एक
- ॲन ऑफ यॉर्क (२ नोव्हेंबर १४७५ - मृत्यू २३ नोव्हेंबर १५११)
- जॉर्ज, ड्यूक ऑफ बेडफोर्ड (जन्म मार्च १४७७ - मृत्यू- मार्च १४७९), सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर कॅसलमध्ये दफन करण्यात आले
- कॅथरीन ऑफ यॉर्क (जन्म १४ ऑगस्ट १४७९ - मृत्यू १५ नोव्हेंबर १५२७), काउंटेस ऑफ डेव्हॉन
- ब्रिजेट ऑफ यॉर्क (जन्म १० नोव्हेंबर १४८० - मृत्यू १५०७), डार्टफोर्ड प्रायरी, केंट येथील नन
संदर्भ
[संपादन]- ^ Karen Lindsey, Divorced, Beheaded, Survived, p. xviii, Perseus Books, 1995.
- ^ A Complete History of England with the Lives of all the Kings and Queens thereof; London, 1706. p. 486
- ^ Kennett, White; Hughes, John; Strype, John; Adams, John; John Adams Library (Boston Public Library) BRL (16 June 2019). "A complete history of England: with the lives of all the kings and queens thereof; from the earliest account of time, to the death of His late Majesty King William III. Containing a faithful relation of all affairs of state, ecclesiastical and civil". London: Printed for Brab. Aylmer ... – Internet Archive द्वारे.
- ^ Jewell, Helen M. (1996). Women in Medieval England. Manchester University Press. ISBN 9780719040177.
- ^ Baldwin, David, Elizabeth Woodville: Mother of the Princes in the Tower.
- ^ Richardson, Douglas (2011). Magna Carta Ancestry: A Study in Colonial and Medieval Families, ed. Kimball G. Everingham II (2nd ed.). Salt Lake City. आयएसबीएन 1449966381, pp 304–7